सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या ‘केदारनाथ’ या आगामी चित्रपटातून सारा अखेर तिच्या कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. काही दिवसांपूर्वीच सारा, तिची आई अमृता सिंग, अभिषेक कपूर आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत हे एकत्र दिसले होते. त्यानंतर सारा आपल्या चित्रपटात दिसणार असल्याचे वृत्त स्वतः अभिषेकनेच दिलेले. मात्र, या चित्रटाविषयी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. नुकताच सारा आणि अभिषेकचा एक फोटो सोशल मीडियावर आला आहे. उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराबाहेर हा फोटो काढल्याचे दिसते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या दिग्दर्शक अभिषेक त्याच्या आगामी चित्रपटातील लोकेशन्ससाठी पाहणी करत आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटाचा सर्वाधिक भाग उत्तराखंडमध्येच चित्रीत करण्यात येणार आहे. सारा आणि अभिषेकने सकाळच्या आरतीला उपस्थिती लावून आपल्या चित्रपटासाठी भगवान शंकराचा आशिर्वाद घेतला. एका प्रेमकथेवर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणास वर्षाअखेर सुरुवात होईल.

वाचा : ‘दंगल’ फेम झायरा वसिमची कार दाल लेकमध्ये कोसळली; नागरिकांनी वाचवले प्राण

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच साराने सर्वांचे लक्ष वेधण्यात यश मिळवले आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी असलेली सारा करण जोहरच्या चित्रपटातून पदार्पण करणार असल्याच्या चर्चा होत्या. पण, काही कारणास्तव तसे होऊ शकले नाही. करण जोहरच्या बर्थडे पार्टीतही ही स्टार किड आकर्षणाचा बिंदू ठरली. पार्टीत ती इतर सेलिब्रिटींसोबत मजामस्ती करतानाही दिसली.

वाचा : फक्त ३० दिवसांच्या शूटींगसाठी अजय देवगणने घेतली एवढी रक्कम!

दरम्यान, अभिषेक कपूरसोबत ‘काय पो छे’ चित्रपटात काम करणारा सुशांत सिंग राजपूत पुन्हा एकदा या दिग्दर्शकासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. तसेच, सारासोबत काम करण्याविषयी त्याला विचारले असता तो म्हणालेला की, अजून आम्ही चित्रपटासाठी करारबद्ध होणे बाकी आहे. त्यामुळे सारासोबत काम करण्याविषयी मी सध्या काही बोलू शकत नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sara ali khan visits kedarnath with abhishek kapoor to seek blessings for her debut film co starring sushant singh rajput