Screen Awards 2025 on YouTube: सिनेमा आणि कथा सादरीकरणाच्या क्षेत्रातील सर्वात नामांकित सोहळा म्हणून द इंडियन एक्सप्रेसच्या स्क्रिन अवॉर्ड्सकडे पाहिले जाते. यावर्षीचे स्क्रिन अवॉर्ड्स सोहा युट्यूबवर पाहता येणार आहे. सिनेसृष्टीशी संबंधित अनेक पुरस्कार सोहळे भारतात आहेत, पण स्क्रिन अवॉर्ड्सचे स्थान त्यात वेगळे आहे. संपादकीय विश्वासाहर्ता, सांस्कृतिक वारसा आणि डिजिटल रिच याचे उत्तम मिश्रण या सोहळ्यातून दिसते.

द इंडियन एक्सप्रेसने नितीमत्तेवर आधारित पत्रकारिता केली आहे. या समुहाचे पाठबळ असलेला स्क्रिन पुरस्कार सोहळाही प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेवर आधारित असा आहे. पुरस्कारासाठी विजेत्यांची निवड ही स्क्रीन अकदामीद्वारे केली जाते. ही अकादमी स्वतंत्र असून ना नफा या तत्वावर काम करणारी आहे, तसेच उत्कृष्टतेला प्राधान्य देणारी आहे.

इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका याबद्दल माहिती देताना म्हणाले, “व्यावसायिक यशाच्या पलीकडे जाऊन सर्जनशीलतेला महत्त्व देणाऱ्या अशा एका व्यासपीठाची भारतीय सिनेसृष्टीला गरज आहे. आपले कथाकार संस्कृती, परंपरेची कास धरत भविष्याचा वेध घेणारे १४० कोटी भारतीयांचे स्वप्न पडद्यावर साकार करत असतात. हा पुरस्कार सोहळा त्याच भावनेचा सन्मान करत भारताच्या धाडसी आणि खऱ्याखुऱ्या आवाजाला एक मंच प्राप्त करून देत आहे. आमच्या या प्रयत्नांना युट्यूबची मोलाची साथ लाभत आहे, याबद्दल आत्यंतिक आनंद वाटतो.”

इंडियन एक्सप्रेस समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका

स्क्रिन अवॉर्ड्स हे लवकरच युट्यूबवर प्रसारित केले जाणार आहेत. यामुळे जागतिक स्तरावरील प्रेक्षकांना याचा आनंद घेता येईल. तीन महिने चालणाऱ्या या उत्सवात प्रथमच बॉलीवूडमधील मोठे तारे, तारका युट्यूबवरील क्रिएटर्सबरोबर एकाच मंचावर येतील.

प्रेक्षकांचा मनोरंजनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला आहे. इंटरनेटचा वाढता प्रसार, कनेक्टेड टीव्ही (सीटीव्ही)चा वेगाने होणारा विकास आणि मोबाइलचा वाढलेला वापर, यातून मनोरंजनाचे बदललेले जग दिसते.

इंडियन एक्सप्रेसबरोबरच्या सहकार्याबाबत बोलताना युट्यूबच्या भारतातील व्यवस्थापकीय संचालक गुंजन सोनी म्हणाल्या, स्क्रिन अवॉर्ड्सचे प्रसारण करण्यात आम्हाला आनंद होत आहे. युट्यूचे अब्जावधी प्रेक्षक आहेत, त्यांना त्यांचा आवडता कंटेट इथे पाहता येतो. आता सिनेमाच्या जगतातील एका मंतरलेल्या रात्रीचा अनुभव प्रेक्षकांना प्राप्त करून देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

युट्यूबच्या भारतातील व्यवस्थापकीय संचालक गुंजन सोनी

स्क्रीन अवॉर्ड्सच्या प्रसारणासाठी युट्यूब हे एक आदर्श स्थान आहे. याची प्रचिती आकडेवारीवरून येईल. कॉमस्कोअरच्या माहितीनुसार, भारतातील १८ वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या पाचपैकी चार इंटरनेट युजर्सपर्यंत युट्यूब पोहोचले आहे. या प्लॅटफॉर्मवरील मनोरंजनात्मक व्हिडीओंनी २०२४ मध्ये जगभरात दररोज ७.५ अब्ज पेक्षा जास्त व्ह्यूज मिळवले आहेत.

स्क्रीन अवॉर्ड्सच्या क्युरेटर प्रियांका सिन्हा झा म्हणाल्या, स्क्रीन अवॉर्ड्सची स्थापना १९९५ साली करण्यात आली. आजच्या सुपरस्टार्सना हा पुरस्कार आजवर मिळालेला आहे, त्यांच्या आयुष्यातील कदाचित हा पहिलाच पुरस्कार आहे.

स्क्रीन अवॉर्ड्सच्या क्युरेटर प्रियांका सिन्हा

अवॉर्डसंबंधी चौकशी किंवा तपशीलासाठी विनीत सिंह vineet.singh@indianexpress.com यांच्याशी संपर्क साधू शकता.

तसेच प्रायोजकत्व आणि ब्रँड इंटिग्रेशन्ससाठी पूजा पुरी यांच्याशी pooja.puri@indianexpress.com या ईमेलवर आयडीवर संपर्का साधू शकता.