शाहरूख खानचा मुलगा आर्यन मध्य लंडनमधील ‘सेव्हन ओक स्कुल’मध्ये शिकत आहे. अनेक सेलिब्रिटींची मुले या शाळेत शिकतात. अपल्या या मोठ्या मुला प्रती अभिमान दर्शविणारा संदेश शाहरूखने टि्वटरवर पोस्ट केला आहे. टि्वटरवर पोस्ट केलेल्या संदेशात शाहरूख म्हणतो – मुलाला शाळेत सोडलं. मला त्याचा खूप अभिमान वाटतो. रेडिओवर यु गोना मिस मी व्हेन आय अॅम गॉन हे गाणं सुरू आहे. टि्वटरवरील या संदेशाबरोबरच त्याने आर्यन आणि त्याचं छायाचित्रदेखील प्रसिध्द केलं आहे. मोठा मुलगा आर्यन, १३ वर्षाची मुलगी सुहाना आणि अबराम नावाचा छोटा मुलगा असलेला शाहरूख आपल्या मुलां प्रती अतिशय भावूक असून, त्यांची तो खूप काळजी घेतो. माध्यमांपासून दूर ठेवण्यासाठी आर्यनला शिक्षणासाठी परदेशात पाठवण्याचा निर्णय आपण घेतल्याचे या आधीच शाहरूखने सांगितले आहे. सुहाना आणि आर्यन प्रसिध्दीपासून दूर राहणे पसंत करत असले तरी आपल्या मुलांबाबतचे संदेश टि्वटरवर पोस्ट करण्याचा मोह शाहरूखला आवरत नाही. सध्या शाहरूख खान दिग्दर्शक फराह खानच्या ‘हॅपी न्यु इयर’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.