‘या’ कारणामुळे शाहरुख आजही विसरला नाही चंकी पांडेचे ‘ते’ उपकार

काल चंकी पांडेने लेक अनन्यासोबत ईडीच्या ऑफिसमध्ये हजेरी लावली होती.

shahrukh khan, chunky pandey,
काल चंकी पांडेने लेक अनन्यासोबत ईडीच्या ऑफिसमध्ये हजेरी लावली होती.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आणि अभिनेता चंकी पांडे हे खूप चांगले मित्र आहेत. या दोघांच्या मैत्रीचे बऱ्याचवेळा उदाहरण दिले जाते. आज शाहरुखला किंग खान म्हणून ओळखत असले तरी तो त्या लोकांना विसरला नाही ज्यांनी कठीण काळात त्याची मदत केली आहे. त्यापैकी एक अभिनेता चंकी पांडे आहे.

चंकी पांडे त्याचा खास मित्र आणि कुटुंबाचा एक भाग असल्याचं शाहरुख एकदा म्हणाला होता. अशीच मैत्री या दोघांच्या मुलांमध्ये दिसून येते. चंकीची लेक अनन्या ही शाहरुखची लेक सुहानाची जवळची मैत्रिण आहे. अनन्या फक्त सुहानाची नाही तर आर्यनची देखील खास मैत्रिण आहे. दरम्यान, आर्यनला ड्रग्स प्रकरणात अटक केल्यानंतर आता अनन्याचं नाव देखील समोर येत आहे. अशा परिस्थितीत देखील चंकीच्या कुटुंबाने शाहरुखच्या कुटुंबाची साथ सोडली नाही.

चंकीने शाहरुखला बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यात मदत केली होती. शाहरुख आणि चंकी यांची मैत्री ८०च्या दशकात झाली होती. तेव्हाच शाहरुख त्याच्या करिअरची सुरुवात करण्यासाठी मुंबईत आला होता. त्यावेळी चंकी हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक होता आणि तो अनेक चित्रपट करत होता. चंकीने त्याच्या घरात शाहरुखला आश्रय दिला होता, असे शाहरुखने सांगितले होते. करिअरमध्ये स्ट्रगल करत असताना शाहरुख चंकीच्या घरी राहत होता.

आणखी वाचा : जात लपवण्यासाठीच वडिलांनी स्वीकारलं ‘बच्चन’आडनाव, अमिताभ यांचा खुलासा

त्यावेळी चंकी सगळीकडे जाताना शाहरुखला सोबत घेऊन जात असे. तेव्हाच चंकीने शाहरुखची ओळख चित्रपटसृष्टीतील लोकांशी करून दिली. तर पुढे देखील चंकीने शाहरुखला मदत केली होती म्हटले जाते.

आणखी वाचा : ‘एवढं मोठ घर काय कामाचं आहे…’, हातातील कॉफी मगमुळे करीना झाली ट्रोल

चंकीमुळे शाहरुख चित्रपटसृष्टीत पदार्पण करू शकला आणि त्यासाठी शाहरुख आभारी राहील. शाहरुखने बऱ्याचवेळा चंकीचे कौतुक केले आहे. शाहरुख आणि चंकीची मुले म्हणजे आर्यन, सुहाना आणि अनन्या हे जवळचे मित्र आहेत. शाहरुखची पत्नी गौरी खान आणि चंकीची पत्नी भावना पांडे या देखील जवळच्या मैत्रिणी आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shahrukh khan will always be thankful to chunky pandey for this reason dcp

Next Story
मी तुझ्यासाठी गांजाची व्यवस्था करते; ‘त्या’ चॅटसंबंधी विचारल्यानंतर अनन्या NCBला म्हणाली, “मी तर मस्करी…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी