शिल्पा शेट्टीची बहीण आणि अभिनेत्री शमिता शेट्टीचा आज वाढदिवस. बिग बॉस १५ मध्ये सहभागी झालेल्या शमिता शेट्टीनं २००० साली यश चोप्रा यांच्या ‘मोहब्बतें’ चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. या चित्रपटातील तिच्या अभिनयानं सर्वांची मनं जिंकली. त्यानंतर शमिता वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये दिसेल असं सर्वांना वाटलं होतं. पण असं झालं नाही. शमिताची चित्रपट कारकिर्द फारशी चालली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शमिताचा जन्म मंगळुरू येथे झाला. तिनं सेंट अँथोनी गर्ल्स हायस्कुलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मुंबईच्या सीडेनहम कॉलेजमधून तिनं ग्रॅज्यूएशन पूर्ण केलं. शमिता शेट्टीला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी पदार्पणाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. पण त्यानंतर तिचे चित्रपट फारसे चालले नाहीत. बॉलिवूडमध्ये ती अभिनेत्री नाही तर शिल्पा शेट्टीची बहीण म्हणूनच ओळखली जाऊ लागली.

काही मीडिया रिपोर्टनुसार, शमिता शेट्टीचं नाव अभिनेता मनोज बाजपेयीसोबत जोडलं गेलं होतं. ‘फरेब’ आणि ‘बेवफा’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. मनोज बाजपेयी विवाहित असल्यानं या दोघांचं नातं वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. दरम्यान मनोज बाजपेयीसोबत लग्न न झाल्यानं शमितानं त्यानंतर कोणाशीच लग्न केलं नाही असंही बोललं गेलं. अर्थात या दोघांनीही यावर कधीच कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. याशिवाय शमिता शेट्टीचं नाव अभिनेता हरमन बावेजा आणि आफताब शिवदासानी यांच्याशीही जोडलं गेलं होतं.

शमिता शेट्टीनं अद्याप लग्न केलेलं नाही. मात्र बिग बॉस ओटीटीच्या वेळी ती आणि राकेश बापट यांच्यातील मैत्री सर्वाधिक चर्चेत आली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर या दोघांनीही त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. जेव्हा ती बिग बॉस १५ मध्ये सहभागी झाली त्यावेळी राकेशनं तिला पूर्ण साथ दिली. आज शमिताच्या वाढदिवशीही त्यानं इन्स्टाग्रामवर तिच्यासोबतचे फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shamita shetty birthday actress was secretly dating manoj bajpayee before raqesh bapat mrj