बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर ३ वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर परतणार आहे. रणबीरचे ‘शमशेरा’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ असे दोन चित्रपट एका मागोमाग एक प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. सध्या रणबीर ‘शमशेरा’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहे. दोघांनीही एका रिअलिटी शोच्या मंचावर ‘शमशेरा’च्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती मात्र यावेळी वाणीला चाहत्यांनी घेरलं आणि या गर्दीतून बाहेर पडण्यासाठी रणबीरने तिला मदत केली. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाणी कपूर आणि रणबीर कपूर यांचा गर्दीतील हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर वाणीला गर्दीतून सांभाळून पुढे घेऊन जाताना आणि तिला कोणाचा धक्का लागणार नाही याची काळजी घेताना दिसत आहे. रणबीर कपूरचा हा व्हिडीओ प्रसिद्ध व्हिडीओ जर्नलिस्ट विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहते रणबीर कपूरचं कौतुक करताना दिसत आहेत.

आणखी वाचा- रिलीजपूर्वीच दिग्दर्शकाने सांगितली रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ची कथा!

रणबीर कपूर आणि वाणीच्या या व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरनं लिहिलं, “रणबीर खरोखरच एक जेंटलमन आहे.” दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, “रणबीर एक असा अभिनेता आहे जो महिलांचा आदर करतो. त्यामुळेच तो सर्वांचा आवडता आहे.” तर अन्य एकाने रणबीरला ‘रिअल सुपरस्टार’ असं देखील म्हटलं आहे. याशिवाय काही युजर्सनी, “रणबीर वाणीला शिल्ड सारखं वापरून स्वतःचा बचाव करत आहे का?” अशा आशयाच्या मजेदार कमेंट देखील केल्या आहेत.

दरम्यान रणबीर कपूर आणि वाणी कपूर यांनी नुकतीच ‘डान्स दिवाने ज्युनिअर्स’च्या मंचावर हजेरी लावली होती. ज्या ठिकणी रणबीरची आई आणि अभिनेत्री नीतू कपूर देखील उपस्थित होत्या. नीतू कपूर यांनी रणबीर आणि वाणी यांच्यासोबत ‘शमशेरा’च्या गाण्यावर धम्माल डान्स केला. रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ चित्रपट येत्या २२ जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shamshera actor ranbir kapoor and vaani kapoor video goes viral mrj