“जेव्हा माझ्या ११ वर्षाच्या मुलाचे निधन झाले तेव्हा शाहरूख…”, शेखर सुमनचे ट्वीट व्हायरल

आर्यन खानच्या अटकेनंतर शेखर सुमन यांनी सांगितली जुनी आठवण

shekhar suman, shahrukh khan,
शेखर सुमन हे शाहरुख आणि गौरीच्या दु:खात सामिल झाले आहेत.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला काही दिवसांपूर्वी ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली होती. आर्यनच्या अटकेनंतर शाहरुख आणि गौरीवर दु:खाचं डोंगर कोसळं आहे. आता त्या दोघांच्या दु: खात अभिनेता शेखर सुमन शामिल झाला आहे. शाहरुखच्या दु: खाविषयी बोलताना शेखरने सांगितले की त्याच्या ११ वर्षाच्या मुलाच्या मृत्यूनंतर त्याला भेटायला शाहरुख आला होता.

शेखर यांनी एक ट्विट करत शाहरुख आणि गौरी खान यांना पाठिंबा दिला आहे. “माझे मन शाहरुख आणि गौरी खानसोबत आहे. एक वडील म्हणून अशा परिस्थितीला तोंड देणं किती अवघड आहे हे मी समजू शकतो. काहीही झाले तरी पालकांना अशा परिक्षेतून जाणे सोपे नसते,” अशा आशयाचे ट्वीट शेखर यांनी केले आहे.

आणखी वाचा : बिग बींनी जलसाजवळील जागा SBI ला दिली भाडेतत्वावर, भाडं ऐकून येईल चक्कर

एवढंच नाही तर शेखर यांनी एक जुना किस्सा सांगितला आहे. हे ट्वीट शेअर करत त्यांनी मुलगा गमावल्याची व्यथा सांगितली आहे. “जेव्हा मी माझा ११ वर्षाचा मोठा मुलगा आयुष गमावला, तेव्हा शाहरुख एकमेव अभिनेता होता जो मला भेटण्यासाठी फिल्मसीटीला जिथे मी चित्रीकरण करत होतो तिथे आला आणि त्याने मला मिठी मारली होती. एक वडील म्हणून शाहरुख आता कशा परिस्थितीतून जात असेल हे जाणून मला खूप दुःख झाले आहे,” असे शेखर म्हणाले.

आणखी वाचा : ‘कुंद्राला भेट…’, ब्रालेटमध्ये विमानतळावर पोहोचल्यामुळे उर्फी जावेद पुन्हा एकदा ट्रोल

दरम्यान, आर्यन खानची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे. त्याच्यासोबत इतर पाच आरोपींना आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले. पुढील १५ दिवस आर्यनला जेलमधील सर्व नियम पाळावे लागणार आहेत. येत्या पाच दिवस आर्यनचा मुक्काम आर्थर रोड जेलमध्ये असणार आहे. यावेळी जेलमध्ये आर्यन खानला कोणतीही खास ट्रीटमेंट दिली जाणार नाही. त्याला इतर कैद्यांप्रमाणेच वागवले जाईल. तसेच न्यायालयाच्या आदेशापर्यंत त्याला बाहेरचे काहीही अन्न मिळणार नाही. त्यांना फक्त तुरुंगाचे अन्न दिले जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shekhar suman shown support to shahrukh khan and gauri khan amid aryan khans arrest in drug case dcp

Next Story
‘कुंद्राला भेट…’, ब्रालेटमध्ये विमानतळावर पोहोचल्यामुळे उर्फी जावेद पुन्हा एकदा ट्रोल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी