राज कुंद्रा प्रकरण : “सनी लिओनी तर असल्या उद्योगांची क्वीन, तिला अटक करुन जन्मठेपेची शिक्षा द्या”

राज कुंद्रांना अटक झालीय तर अभिनेत्री सनी लिओनीला का सूट देण्यात आलीय असा प्रश्न विचारत सनी ही या असल्या उद्योगांची क्वीन असल्याचा टोला राजूने लगावलाय.

Raj Kundra Arrest Sunny Leone
एका व्हिडीओमधून करण्यात आलीय टीका (फोटो इन्टाग्राम आणि द इंडियन एक्सप्रेसवरुन साभार)

लोकप्रिय हास्य कलाकार राजू श्रीवास्तव नेहमीच आपली मतं अगदी मजेदार पद्धतीने मांडण्यासाठी ओळखला जातो. सध्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना पॉर्नोग्राफी प्रकरणावरुन अटक झाल्याने त्यासंदर्भात मनोरंजन सृष्टीमध्ये जोरदार चर्चा सुरु आहेत. अशातच आता राजू श्रीवास्तवने एका व्हिडीओच्या माध्यमातून या प्रकरणावर आपली मतं मांडत अभिनेत्री सनी लिओनीला अटक करण्याची मागणी केलीय.

राज कुंद्रांवर साधला निशाणा…

राज कुंद्रांनी लॉकडाउनच्या कालावधीमध्ये अश्लील चित्रपट बनवण्यास सुरुवात केल्याचं राजू श्रीवास्तवने म्हटलं आहे. आपण पाच वर्षांपूर्वी एका सामन्यादरम्यान पहिल्यांदा राज कुंद्रांना भेटलो होतो, असंही राजू श्रीवास्तवने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. त्यावेळेस त्यांचं लक्ष हे सामन्यापेक्षा चिअरगर्ल्सवर अधिक होतं असा टोलाही राजू श्रीवास्तवने लगावलाय. तसेच पुढे बोलताना राज कुंद्रा हे पहिले असे व्यक्ती आहेत ज्यांनी आपल्या कृत्याने पत्नीला बदनाम केलं आहे, असंही राजू श्रीवास्तव यांनी म्हटलं. राजू श्रीवास्तवने आपल्या खास शैलीमध्ये उपहासात्मक आणि विनोदी अंगाने या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

नक्की वाचा >> “राज कुंद्राच्या हॉटशॉट्स App साठी काम केल्याने नवऱ्याने तिला घटस्फोट दिला”

सनीला सूट का देण्यात आलीय?

राजू श्रीवास्तवने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये राज कुंद्रांना अटक झालीय तर अभिनेत्री सनी लिओनीला का सूट देण्यात आलीय असा प्रश्नही विचारलाय. सनी ही या असल्या उद्योगांची क्वीन असल्याचा टोला राजू श्रीवास्तवने लगावलाय. ज्या पद्धतीने पोलिसांनी राज कुंद्रांवर कारवाई केलीय त्याच पद्धतीने कारवाई करायची झाल्यास सनी लिओनीला जन्मठेपेची शिक्षा द्यावी लागेल, असं म्हटलं आहे.

नक्की पाहा >> कंडक्टरचा मुलगा, हिरे व्यापारी, शिल्पा शेट्टीशी लग्न ते पॉर्न प्रकरण; राज कुंद्रांबद्दलच्या ३० खास गोष्टी

हे लोक परदेशात नागरिकत्व घेतात अन्…

राज कुंद्रा आणि सनी लिओनीसारखी लोक परदेशात जाऊन तेथील नागरिकत्व घेतात आणि पुन्हा भारतात येऊन राहतात. येथे येऊन ते साध्या सरळ मुलींना फसवतात. त्यानंतर त्यांच्याकडून अश्लील चित्रपट बनवून घेतात. त्यानंतर हे चित्रपट परदेशातून इंटरनेटवर अपलोड करतात. भारतीय कायद्याच्या कचाट्यात आपण सापडू नये म्हणून ते हे उद्योग करतात, असा आरोप राजू श्रीवास्तवने केलाय.

नक्की वाचा >> कुंद्रा प्रकरण : “तिला रात्रीच सोडवावं लागेल, नाहीतर…”; त्या Chat वर Nuefliks च्या यश ठाकूरचा सिंगापूरमधून मोठा खुलासा

रोज यांच्या खात्यावर येतात लाखो रुपये

कुंद्रांच्या खात्यावर रोज १०-१२ लाख आणि सनी लिओनीच्या खात्यावर २५ ते ३० लाख रुपये येतात. या लोकांकडे अशी यंत्रणा आहे की ज्या माध्यमातून ते किती भारतीयांनी आपले अश्लील चित्रपट पाहिले यावरुन नजर ठेवतात, असंही राजू श्रीवास्तव म्हणालाय.

माझ्यासोबतही झालेला करार….

राज कुंद्राला अटक करण्यात आल्याचं मी पाहिलं तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला असंही राजू श्रीवास्तवने म्हटलं आहे. एका आठवड्यापूर्वीच त्यांनी माझ्यासोबत एका चित्रपटासाठी करार केला होता. आमच्या चित्रपटाचं शुटींग सुरु होणार होतं. त्यावेळी मी त्यांना सतत विचारत होतो की चित्रपटाची कथा काय असेल. तेव्हा राज कुंद्रा यांनी फक्त कथा चांगली असेल तुम्हाला त्यातून आनंद मिळेल असं उत्तर दिल्याचंही राजू श्रीवास्तव यांनी मजेशीर पद्धतीने म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shilpa shetty husband raj kundra arrest raju srivastava says sunny leone should get life imprisonment by this logic scsg

फोटो गॅलरी