आयपीएल २०१३ च्या स्पॉट फिक्सिंग वादात अडकलेली हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच ‘स्टार परिवार अवॉर्डस्’ या कार्यक्रमात दिसली. यश राज स्टूडिओत आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शिल्पा ‘इंडियाज डांसिंग सुपरस्टार’ मध्ये पंच असलेल्या रितेश देशमुखबरोबर आली होती. या कार्यक्रमात काळ्या आणि गडद रंगाचा पोशाख घालून आलेल्या शिल्पाला एक विशेष पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमात शिल्पा म्हणाली, मागील काही दिवसांचा काळ माझ्यासाठी अतिशय वाईट होता, आता मला सतर्क राहण्याची गरज आहे. परंतु, या पुरस्काराच्या रूपाने स्वत:चा  सन्मान परत मिळाल्यासारखे वाटत आहे. मला खूप कमी वेळेला पुरस्कार मिळाला असल्यामुळे, जेव्हा मला पुरस्कार मिळतो तेव्हा मी खूप नर्वस होते .
या कार्यक्रमाची कोरिओग्राफी शामक डावरने केली होती. आपल्या आगामी ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई अगेन’ चित्रपटाच्या प्रचारासाठी सोनाक्षी सिन्हा आणि इमरान खान यांनी सुद्धा या कार्यक्रमात भाग घेतला. स्टार प्लसने २००३ पासून ‘स्टार परिवार’ कार्यक्रमाची सुरूवात केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shilpa shetty makes first public appearance post ipl spot fixing controversy