बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. श्रद्धाचे लाखो चाहते आहेत. श्रद्धा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच श्रद्धाने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. श्रद्धाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत श्रद्धा समुद्रात असल्याचं दिसत आहे. हा फोटो श्रद्धाच्या आईने काढला आहे. “फोटो आईने काढला” असे कॅप्शन श्रद्धाने या फोटोला दिले आहे. श्रद्धाच्या या फोटोला १३ लाख पेक्षा जास्त लोकांनी लाइक केले आहे.

श्रद्धाला इन्स्टाग्रामवर ५८ मिलियन पेक्षा जास्त लोक फॉल करतात. ‘श्रद्धा बागी ३’ या चित्रपटात दिसली होती. यातील श्रद्धा आणि टायगर श्रॉफच्या जोडीला चाहत्यांनी पसंती दिली होती. या आधी श्रद्धाचा ‘स्ट्रीट डान्सर ३ डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. श्रद्धा लवकरच रणबीर कपूर सोबत त्यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे.