बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. श्रद्धा कपूर ही नेहमी तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठ यांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यावर श्रद्धा कपूरने अप्रत्यक्षरित्या पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठ हे गेल्या ४ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र काही कारणांमुळे त्या दोघांचा ब्रेकअप झाल्याचे बोललं जात आहे. त्यांच्या ब्रेकअपची बातमी ऐकल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र नुकतंच श्रद्धाने रोहन आणि तिच्या ब्रेकअपच्या अफवांवर स्पष्टीकरण दिले आहे.
श्रद्धा कपूरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यासोबत तिने एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने त्याला हटके कॅप्शन दिले आहे. अजून सांगा, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. तिच्या या कॅप्शनमुळे ब्रेकअप झाल्याचे सांगणाऱ्या सर्व लोकांची बोलती बंद झाली आहे. श्रद्धाच्या या फोटोवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. तिच्या या फोटोवर कमेंट करत रेमो डिसूझाने हार्ट इमोजी शेअर केले आहेत. त्यासोबत तिच्या अनेक चाहत्यांनी यावर कमेंट केल्या आहेत.
श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठचे ब्रेकअप! ४ वर्षानंतर रिलेशनशिपमध्ये आला दुरावा
श्रद्धा कपूर ही सध्या अनेक चित्रपटांमुळे चर्चेत आहे. ती लवकरच निर्माता-दिग्दर्शक लव रंजन यांच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही. या चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यासोबत ती लवकरच ‘चालबाज इन लंडन’ आणि विशाल फुरियाच्या ‘पाइपलाइन’ या चित्रपटातही झळकणार आहे.