अभिनेत्री श्वेता तिवारी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. श्वेता तिच्या अभिनयासोबत गेल्या काही दिवसांपासून तिच्या फिटनेसमुळे चांगलीच चर्चेत आहे. तर श्वेताची मुलगी पलक देखील सोशल मीडियवर सक्रिय असून पलक ग्लॅलरस फोटो शेअर करत असते. ४० वर्ष वय असलेल्या श्वेता तिवारीला २० वर्षांची मुलगी असूनही श्वेता आजही खूप फिट आहे. श्वेता आणि पलक दोघींचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. या मायलेकींच्या फोटोंना नेटकऱ्यांकडून मोठी पसंती मिळताना दिसते.
नुकताच श्वेता तिवारी आणि तिची मुलगी पलकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओत श्वेता आणि पलक वर्कआउट करताना दिसत आहेत. या वर्कआउटच्या व्हिडीओत श्वेता आणि पलक दोघीही मोठ्या मेहनतीने वर्कआउट करताना दिसत आहेत. या व्हीडीओतील श्वेताचा उत्साह आणि एनर्जी पाहून चाहते थक्क झाले आहेत. श्वेता मुलगी पलकला टक्कर देताना दिसतेय.
हे देखील वाचा: Raj Kundra Porn case: विनाकारण उमेश कामतला मन:स्ताप; खात्री न करता वापरला त्याचा फोटो
साहिल राशिद या फिटनेस ट्रेनरने श्वेता आणि पलकचा हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. या व्हिडीओत श्वेता आणि पलक रोप वर्कआउट करत असल्याचं दिसून येतंय. यात त्या एकमेकींची मदत करत आहेत. हा व्हीडीओ शेअर करत साहिलने कॅप्शनमध्ये “जशी आई तशी मुलगी” असं म्हंटलं आहे.
लवकरच श्वेता तिवारी ‘खतरों के खिलाडी’ या स्टंट शोमध्ये झळकणार आहे. या शोमध्ये श्वेता अनेक स्टंट करताना दिसणार आहे.