असे म्हंटले जाते की नात्याची किंमत दूर गेल्यावर समजते. मात्र अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री पर्ण पेठे यांच्या आगामी वेब सीरिज ‘अंधातरी’मध्ये जवळ आल्यावर नात्याची खरी किंमत कळते असं सांगितलं आहे. ही कथा आत्ताच्या परिस्थितीवर आधारित आहे. लाँग-डिस्टंस रिलेशनशिपमध्ये असणारी ही जोडी जवळं आल्यावर काय होतं? हे या सीरिजमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नुकताच सिद्धार्थने या सीरिजचा ट्रेलर शेअर केला आहे. ही वेब सीरिज हंंगामा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसेल. नातं, प्रेम, विश्वास याचा प्रवास तुम्ही या सीरिजमध्ये अनुभवू शकाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘अंधातरी’ या सीरिजमध्ये सिद्धार्थ आणि पर्ण एक तरुण जोडपं आहे जे दोन वेगवेगळया शहरात राहात असतात. दोघं  वेगवेगळ्या शहरात राहत असले तरी त्यांच्यातील नात खूप घट्ट असतं. मात्र हे दोघे जेव्हा एकत्र येतात तेव्हा नेमकं काय होतं? ते या सीरिजच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेलं. सिद्धार्थ आणि पर्ण यात मुग्धा आणि मुकुल या दोन अतिशय प्रेमात असलेल्या कपलची भूमिका साकारत आहेत. जे लाँग-डिस्टंस रिलेशनशिपमध्ये असतात, मात्र २१ दिवसाच्या लॉकडाऊनमुळे त्यांना एकत्र राहण्याची संधी मिळते. आता या लॉकडाऊनच्या वेळेस नेमकं काय होतं? त्यांच्यातील नातं बहरेल का? त्यांच्या मतंभेद निर्माण होऊन ते विभक्त होतील हे जेव्हा सीरिज प्रदर्शित होईल तेव्हाच कळेल.

‘अधांतरी’ ही काहीशी मजेशीर प्रेमळ आणि प्रत्येकाला आपलीशी वाटेल अशी रोमँटिक कॉमेडी कथा आहे. लाँग-डिस्टंस नात्यात असलेल्या जोडप्याला काही कारणांमुळे बराच काळ एकत्र रहावे लागते. काही दिवसंपूर्वी या सीरिजचा लुक रिवील करण्यात आला होता. या सीरिज बद्दल बोलत असताना सिद्धार्थने सांगितले की, ” प्रत्येक जोडपं बांधिलकी, अनुरूपता आणि एकमेकांशी अधिक घट्ट बंध असावेत अशी अपेक्षा करतो. या सीरिजमध्ये हे सगळे प्रश्न काहीशा नाट्यमय मात्र विनोदी पद्धतीने मांडण्यात आले आहेत.”

अभिनेत्री पर्ण पेठे ‘अधांतरी’ या सीरिजबद्दल बोलताना म्हणाली की, “परफेक्ट नसलेल्या लोकांच्या जगात एकदम परफेक्ट बसणारी कथा आहे अंधातरीची. मी मुग्धा या मुंबईतील एका मुलीची भूमिका साकारली आहे. ती लाँग डिस्टंस रिलेशनशीपमध्ये आहे. मात्र, बॉयफ्रेंडसोबत खूप मोठा काळ घालवावा लागतो तेव्हा एकेक गोष्टी स्पष्ट होत जातात. हल्लीच्या आधुनिक जगात नातेसंबंध टिकवून ठेवणे लोकांसाठी फारच कठीण झाले आहे. अशा जगातील अनेक गोष्टींचं प्रतिबिंब यात दिसेल.” अंधातरी सीरिजमध्ये सिद्धार्थ आणि पर्ण बरोबरच विराजस कुलकर्णी, आशय कुलकर्णी आणि आरोह वेलणकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddharth chandekar parna peth starrer marathi new web series adhantari trailer out aad