सिनेसृष्टीत सध्या लग्नसराई सुरू आहे. कोणता ना कोणता कलाकार लग्नबंधनात अडकत आहे. येणाऱ्या काळातही अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. सध्या अभिनेत्री परिणीत चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. अशातच एका दाक्षिणात्य सुपरस्टारनं गुपचूप लग्न उरकलं आहे; यासंबंधीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ने मारली बाजी; ‘आई कुठे काय करते’ मालिकेला टाकलं मागे, पाहा TRP यादी

दाक्षिणात्य सुपरस्टार अशोक सेल्वनने अभिनेत्री कीर्ति पांडियनबरोबर लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते अरुण पांडियन यांची मुलगी कीर्ति पांडियन आहे. अशोक आणि कीर्तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे.

हेही वाचा – “१४ वर्ष अयशस्वी करिअर…” ‘तुझेच मी गीत गात आहे’ फेम तेजस्विनी लोणारीला स्वामींची आली अशी प्रचिती, म्हणाली…

पण अशोक-कीर्ति याचं लग्न नेमकं केव्हा झालं? याचा खुलासा झालेला नाही. दोघांनी १३ सप्टेंबरला इन्स्टाग्रावर लग्नाचे फोटो शेअर केले. तमिळ परंपरेनुसार हे लग्न पार पडलं. माहितीनुसार, १७ सप्टेंबरला दोघांचा ग्रँड रिसेप्शन सोहळा होणार असून यावेळी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार मंडळी हजेरी लावणार आहेत.

हेही वाचा – “…तर तुम्ही भिकेला लागाल”; ‘श्वास’ फेम अभिनेते अरुण नलावडे यांना असं कोण म्हणालं होतं?

दरम्यान, अशोक-कीर्ति दिनाकरन शिवलिंगम यांच्या आगामी ‘ब्लू स्टार’ चित्रपटात झळकणार आहेत. दोघं पहिल्यांदाच ऑनस्क्रीन एकमेकांबरोबर शेअर करणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South superstar ashok selvan and actress keerthi pandian married secretly photo goes viral on social media pps