ss rajamouli on working in hollywood collabrate avangers producer Kevin Feige | Loksatta

‘अ‍ॅव्हेंजर्स’ सीरिजच्या निर्मात्याबरोबर राजामौली काम करणार? म्हणाले “मला हॉलिवूडमध्ये…”

एस.एस. राजामौली यांनी हॉलिवूडमध्ये काम करण्यावर भाष्य केलं आहे.

rajamouli on working in hollywood
हॉलिवूडमध्ये काम करण्याबाबत राजामौलींनी भाष्य केलं आहे. (File Photo)

‘बाहुबली’, ‘आरआरआर’ अशा सुपरहिट चित्रपटांद्वारे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे एस.एस.राजामौली हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांच्या चित्रपटांनी बॉलिवूडलाही वेड लावले आहे. ‘आरआरआर’ या त्यांच्या चित्रपटाला जपानमध्येही भरभरुन प्रेम मिळत आहे.

‘आरआरआर’च्या भरघोस यशानंतर आता राजामौलींना हॉलिवूडकडूनही विचारणा होत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजमौलींनी यावर भाष्य केलं आहे. अ‍ॅव्हेंजर्स सीरिजचे निर्माते केविन फिज यांच्याकडून हॉलिवूड चित्रपटासाठी विचारणा झाल्याबाबत राजामौलींना प्रश्न विचारण्यात आला. यावर राजामौलींनी उत्तर देत हॉलिवूडमध्ये काम करण्याबाबत त्यांचं मत स्पष्ट केलं.

हेही वाचा>> मानसी नाईकचे पती प्रदीप खरेरावर गंभीर आरोप, म्हणाली “पैसे व प्रसिद्धी मिळवण्यासाठी…”

हेही वाचा>> “नट विस्मरणात जातो पण…” विक्रम गोखले यांच्या निधनानंतर अभिनेत्रीने शेअर केला ‘नटसम्राट’मधील व्हिडीओ

ते म्हणाले, “हॉलिवूडमधून मला अनेक चित्रपटांसाठी विचारणा होत आहे. पण सध्या मी महेश बाबूबरोबर चित्रपट करणार आहे. महेश बाबू एक मोठा तेलुगु सुपरस्टार आहे. त्याच्याबरोबर चित्रपट करण्यासाठी मी वचनबद्ध आहे”.  

हेही वाचा>> “मुलींना मेसेज करता तेव्हा त्यांचे कपडे…” चेतन भगत यांच्या वक्तव्यानंतर उर्फी जावेद संतापली

“हॉलिवूडमधून मला खूप काही शिकायला आवडेल. त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांचे टेकनिक या गोष्टी मला शिकायला आवडतील. एकत्र काम करुन उत्तम कलाकृती तयार करू शकतो, हे मला दिसत आहे”, असंही ते पुढे म्हणाले.   

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 15:25 IST
Next Story
रिचा चड्ढाच्या ‘Galwan says hi!’ ट्वीटवर प्रतिक्रिया देताच अक्षय कुमार ट्रोल, अमित मिश्राचा अभिनेत्याला पाठिंबा, म्हणाला, “माफी मागायला…”