अभिनेता सनी देओलनं त्याच्या दमदार अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सनी देओलनं ‘बेताब’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण त्याला खरी लोकप्रियता मिळाली ती ‘गदर’ चित्रपटातून. या चित्रपटातील सनी देओलचे स्टंट आणि डायलॉग्सनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गदर २’च्या शूटिंगचं पहिलं शेड्युल पूर्ण झालं असून सनी देओलनं त्याच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


सनी देओलनं त्याच्या इन्स्टाग्रामवर ‘गदर २’चा फर्स्ट लूक शेअर केला आहे. २० वर्षांनंतर ‘तारा सिंग’ किती बदलला हे देखील या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये सनी देओल डोक्याला पगडी बांधून शेकोटीजवळ बसलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करताना सनीनं लिहिलं, ‘नशिबवान लोकांनाच आयुष्यातली एक खास व्यक्तीरेखा पुन्हा साकारण्याची संधी मिळते.’

आपल्या पोस्टमध्ये सनीनं पुढे लिहिलं, ‘गदर २ चित्रपटाचं पहिलं शेड्युल पूर्ण झालंय.’ सनी देओलच्या या पोस्टवर चाहत्यांच्या उत्स्फुर्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेकांनी सनीचं कौतुक करत त्याला या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या चित्रपटात सनी देओलसोबत अभिनेत्री अमिशा पटेल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सनी आणि अमिशाची मुख्य भूमिका असलेल्या ‘गदर’ चित्रपटाला जून २०२१ रोजी २० वर्षं पूर्ण झाली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny deol share first look of gadar 2 movie photo viral on social media mrj