भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चरित्रपटासाठी मेहनत घेत असलेल्या अभिनेता सुशांत सिंग राजपूतला चित्रीकरणादरम्यान दुखापत झाली आहे. धोनीच्या फलंदाजी शैलीतील खासीयत असलेला ‘हेलिकॉप्टर शॉट’ मारण्याचा सराव करत असताना सुशांतच्या बरगड्यांना इजा झाली. दुखापतीमुळे सुशांतला पुढील आठवडाभर चित्रीकरण करता येणार नाही. डॉक्टरांनी आठवड्याभराचा सक्तीचा आराम सुशांतला सांगितला आहे. चित्रपटात धोनीची भुमिका उत्तरमरित्या वठवण्यासाठी सुशांत गेल्या अनेक दिवसांपासून धोनीच्या अनेक व्हिडिओज पाहत आहे. माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांच्या मार्गदशनाखाली सुशांतला प्रशिक्षण दिले जात आहे. इतकेच नव्हे तर, सुशांतने धोनीसोबत नेटमध्ये काहीकाळ सराव देखील केला आहे. दरम्यान, ‘एमएस धोनी: द अलटोल्ड स्टोरी’ हा धोनीचा चरित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushant singh rajput injured while practicing for ms dhonis signature shot