माजी इंडियन आयडॉलची स्पर्धक मोनाली ठाकूर ही तिच्या संगीत विश्वातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. ती नागेश कुकुनूरच्या ‘लक्ष्मी’ आणि अब्बास टायरवाल्याच्या ‘मॅंगो’ चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत येत आहे. ‘रेस’मधील ‘जरा जरा टच मी’ आणि आगामी चित्रपट ‘लुटेरा’मध्ये ‘सवार लू’ यांसारखी हिट गाणी मोनालीने गायली आहेत. ” मी एक गायिका असले तरी मला नृत्य करण्यास आवडते. संगीत, अभिनय आणि नृत्य हे एकमेकांना जोडले गेले असल्याचे,” मोनालीला वाटते असे ती म्हणाली.
‘लक्ष्मी’ या चित्रपटात तिने बाल वेश्येची भूमिका केली आहे. एका मुलीला वेश्याव्यसायासाठी करण्यात आलेली सक्ती यातून दाखविण्यात आली आहे. अनेक सत्य घटनांवर आधारित या चित्रपटाची कथा असल्याचे मोनालीने सांगितले.
मोनाली अब्बास टायरवाल्याच्या ‘मॅगो’ चित्रपटातही दिसणार असून हा एक रोमॅंण्टिक विनोदी चित्रपट आहे. गोव्यात चित्रीकरण होत असलेल्या या चित्रपटात पाच व्यक्तिंच्या जीवनावरील एक रात्र चित्रीत करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jul 2013 रोजी प्रकाशित
गायिका मोनाली ठाकूरचे बॉलीवूडमध्ये पदार्पण
माजी इंडियन आयडॉलची स्पर्धक मोनाली ठाकूर ही तिच्या संगीत विश्वातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. ती नागेश कुकुनूरच्या 'लक्ष्मी' आणि अब्बास टायरवाल्याच्या 'मॅंगो' चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 01-07-2013 at 06:26 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swaar loon singer monali thakur set for acting debut with mango