Niranjan Kulkarni’s Mother Talks About His Marraige : मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार यंदा लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव साजरा करत आहेत. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता निरंजन कुलकर्णीसुद्धा यंवर्षी लग्नानंतरचा पहिलाच गणेशोत्सव साजरा करत आहे. यानिमित्त त्याने त्याची बायको व आईसह नुकतीच मुलाखत दिली आहे.

गणेशोत्सव निमित्त निरंजनने ‘अल्ट्रा मराठी’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्याने त्याच्या लग्नाबद्दल सांगितलं आहे. निरंजनसह मुलाखतीत त्याच्या आईलाही त्यांच्या मुलाच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलेलं. यावेळी त्यांनी निरंजनला लग्नासाठी एक अट ठेवल्याचं म्हटलं आहे.

निरंजन कुलकर्णीच्या आईने ठेवलेली ‘ही’ अट

निरंजनच्या आईला याबद्दल विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “मला सुशिक्षित मुलगी हवी होती. कारण मी स्वत: प्राध्यापिका आहे. त्यामुळे मी त्याला म्हटलेलं की तू काही कर कुठल्याही मुलीशी लग्न कर पण मला शिकलेली मुलगी पाहिजे. माझी एवढी एकच अट आहे.”

निरंजन कुलकर्णीने काही महिन्यांपूर्वीच लग्नगाठ बांधली होती. त्याच्या बायकोचं नाव मनिषा गुरम असं असून ती न्यूट्रिशनिस्ट व लाइफस्टाईल एक्स्पर्ट आहे. निरंजनने या मुलाखतीत त्याच्या बायकोसाठी खास उखाणाही घेतला आहे. तो म्हणाला, “चतुर्थीच्या दिवशी सुंदर दिसते चंद्राची कोर, मनिषा माझी मधुबाला मी तिचा किशोर.”

निरंजन व त्याची बायको लग्नानंतरचे सर्व सण एकत्र कुटुंबाबरोबर साजरे करताना दिसत आहेत. निरंजन अनेकदा यानिमित्तचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. यावेळीसुद्धा त्याने त्याच्या घरी गणेशोत्सवानिमित्त व्हिडीओ व फोटो शेअर केले आहेत.

निरंजन कुलकर्णीसह यंदा अभिनेत्री दिव्या पुगावकर, अभिषेक राहाळकर यांसारखे छोट्या पडद्यावरील इतर काही कलाकार लग्नानंतरचा पहिला गणेशोतसव साजरा करत आहेत.

दरम्यान, निरंजनबद्दल बोलायचं झालं तर तो खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आला ते ‘स्टार प्रवाह’वरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे. यामध्ये त्याने अभिषेक हे पात्र साकारलेलं. या मालिकेनंतर तो कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुक्ता आहे.