सध्या मराठी मालिका विश्वात स्टार प्रवाह वाहिनींच्या मालिकांची चांगलीच चर्चा रंगताना दिसते. या वाहिनीवरील मालिका कायमच टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असल्याचे पाहायला मिळते. लवकरच यंदाचा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा रंगणार आहे. यानिमित्ताने स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वच कलाकारांचे नृत्यविष्कार पाहायला मिळणार आहेत. या निमित्ताने नुकतंच आई कुठे काय करते मालिका फेम अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते इन्स्टाग्रामद्वारे फोटो-व्हिडीओ पोस्ट करत असतात. नुकतंच त्यांनी स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यानिमित्ताने एक खास पोस्ट केली आहे. यावेळी त्यांनी या पुरस्कार सोहळ्याच्या रिहर्सलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ते सर्वोत्कृष्ट खलनायक या पुरस्काराबद्दल बोलताना दिसत आहेत.
आणखी वाचा : नागराज मंजुळेंनी मराठी भाषेबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यानंतर मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले “मराठीवर प्रभुत्व असणारी…”

मिलिंद गवळींची पोस्ट

“स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2023
19 मार्च संध्याकाळी ७ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर बघायला विसरू नका.
परिवार हा शब्द फार महत्त्वाचा आहे स्टार प्रवाह साठी , स्टार प्रवाह फॅमिली,
एवढ्या मोठ्या वाहिनीने आपल्याला त्यांच्या परिवाराचा सदस्य मानलं आहे. आणि परिवाराच्या एका सदस्याप्रमाणे आपल्याला आदराने आणि प्रेमाने वागणूक दिली जाते, यातच मी भरून पावतो , त्या वाहिनी बद्दल आणि त्यांच्या टीम बद्दल माझ्या मनामध्ये खूप आदर निर्माण झाला आहे.
इतक्या वर्षाच्या अभिनयाच्या कारकिर्दीमध्ये मी दूरदर्शन सह्याद्री व नॅशनल दूरदर्शन ते खाजगी वाहिन्या , almost सगळ्याच वाहिन्यांवर मी अभिनेता म्हणून काम केलेला आहे,
त्यामुळे बहुतेक सगळ्यात वाहिन्यांशी त्यांच्या teams शी माझा खूप जवळून संबंध आला आहे,
माझा अनुभव असा आहे की वाहिन्या खरचं खूप मोठ्या असतात, त्यामध्ये काम करणारीजी माणसं असतात ती सुद्धा हुशार , कर्तृत्ववान आणि मोठीच असतात,
Event च्या वेळेला कलाकाराला कलाकार म्हणून आदर किंवा वागणूक मिळेलच असं नाही, मी अशा मोठमोठ्या सोहळ्यांमध्ये तर मोठमोठ्या कलाकारांकडे दुर्लक्ष व्हायची शक्यता तर असतेच असते,
स्टार प्रवाहच्या सोहळ्यामध्ये स्टार प्रवाह चे मोठे पदाधिकारी सुद्धा आपल्या कुटुंबाचा किंवा आपल्या परिवाराचा कार्यक्रम आहे , किंवा आपल्या घरचा कार्यक्रम आहे , बालकलाकारांपासून जेष्ठ कलाकारांपर्यंत सगळ्यांशीच आपले पाहुणे मंडळी आहेत किंवा आपल्या परिवाराचे सदस्य आहेत अशाच पद्धतीने खूप आपुलकीने आणि आदराने स्वागत करतात .
आई कुठे काय करते या मालिकेचं तिसरा वर्ष आहे,
त्यामुळे माझ्यासाठी हा तिसरा पुरस्कार सोहळा आहे,
या वेळेचा पुरस्कार सोहळा खास आहे,
लोकांना खूप भावेल अशी मला आशा आहे,
यावर्षी सुद्धा माझे मित्र वैभव घुगे यांनी choreograph केलेले अफलातून डान्सेस आहेत .
तर मग मंडळी पाहायला विसरू नका 19 मार्च 2023 संध्याकाळी सात वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2023…”, अशी पोस्ट मिलिंद गवळी यांनी लिहिली आहे.

आणखी वाचा : Video : “मला माझे स्तन…” उर्फी जावेदचे अश्लील इशारे करत बोल्ड वक्तव्य

दरम्यान ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते मिलिंद गवळी हे कायमच चर्चेत असतात. या मालिकेत ते अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. या मालिकेमुळेच ते घराघरात पोहोचले. सध्या ही मालिका टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पाहायला मिळत आहे. यात विविध ट्वीस्ट येतानाही दिसत आहेत.