Aarya Jadhao Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील सातवा आठवडा खूप गाजला. कॅप्टन्सी टास्कमध्ये झालेल्या भांडणात आर्या जाधवने निक्कीच्या कानशिलात लगावली. त्यानंतर बिग बॉसने आर्याला आधी जेलमध्ये टाकलं आणि नंतर भाऊच्या धक्क्यावर रितेशने प्रेक्षकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर बिग बॉसने आर्याला घरातून निष्कासित केलं.
आर्या शनिवारी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. त्यानंतर आता आज पहिल्यांदाच घडलेल्या प्रकारावर ती बोलली आहे. तिने इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत घरात घडलेल्या त्या प्रकारवर मत मांडलं. आर्याने तिच्याकडून चूक झाली अशी कबुली दिली. हिंसा चुकीचीच आहे पण निक्की जो गेम खेळते तोही घाण आहे. मी तिच्यावर हात कसा उचलला याचा अजूनही विचार करतेय असं आर्या म्हणाली.
Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”
बिग बॉस स्क्रिप्टेड असतं का?
आर्याने इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये काही चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंही दिली. तसेच काही प्रश्नांची उत्तरं एक वेगळं सेशन घेऊन देणार असं आर्याने सांगितलं. यावेळी आर्याला एका प्रेक्षकाने प्रश्न विचारला की बिग बॉस स्क्रिप्टेड असतं का? यावर आर्याने नाही असं उत्तर दिलं. बिग बॉस स्क्रिप्टेड नसतं. आम्ही जसे होतो तसेच घरात वागत होतो. शो स्क्रिप्टेड असता तर अभिनय केला असता, असंही आर्या म्हणाली.
बिग बॉसने दिलेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्या व निक्की एकमेकांविरोधात खेळत होत्या. त्यावेळी या दोघींमध्ये झटापट झाली. ‘मी तुला मारेन’ असं आर्या निक्कीला म्हणाली होती, त्यानंतर तिने तिच्यावर हात उचलला. यानंतर निक्कीने आर्याने मारलंय असं म्हणत गोंधळ घातला होता. आर्याने निक्कीला मारल्याची कबुली बिग बॉसच्या घरातही दिली होती. त्यानंतर बिग बॉसने आर्याला जेलमध्ये टाकलं होतं.
दरम्यान, आर्या घराबाहेर पडल्यानंतर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. आर्याला घराबाहेर काढल्यावर बिग बॉस बघणार नाही, बिग बॉस निक्कीची बाजू घेतात, निक्की व अरबाजचाच हा शो आहे त्यांना जिंकवा असं म्हणत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. इतकंच नाही तर अनेकांनी हा शो बॉयकॉट करणार असल्याचंही म्हटलं होतं. आर्याला घराबाहेर काढल्यावर ती परत येईल असं वाटत होतं, पण तूर्तास तरी अशी कोणतीही शक्यता दिसत नाही.
© IE Online Media Services (P) Ltd