Aarya Jadhao on Returning Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व सध्या चांगलेच गाजत आहे. या शोमध्ये अमरावतीची रॅपर आर्या जाधवने निक्की तांबोळीच्या कानशिलात मारली, त्यानंतर आर्याला बिग बॉसने बाहेर काढलं. बिग बॉसच्या या निर्णयानंतर प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच शनिवारी बिग बॉसमधून बाहेर पडलेल्या आर्याने आज इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांशी, चाहत्यांशी संवाद साधला.
आर्याने इन्स्टाग्रामवर लाइव्ह येऊन तिला पाठिंबा देणाऱ्या प्रेक्षकांचे, चाहत्यांचे आभार मानले. तसेच आर्याने निक्कीवर हात उचलला त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, हेही आर्याने सांगितलं. तसेच निक्की खूप वाईट गेम खेळत आहे. गेम खेळताना सात आठवड्यात मलाही बरेचदा लागलं होतं, असंही आर्या म्हणाली. आर्याने निक्कीच्या आईला उत्तर दिलं. “आमची मुलगी मार खायला गेली आहे का,” असं निक्कीची आई प्रमिला तांबोळी म्हणाल्या होत्या. “काकू आम्हीही मार खायला नव्हतो गेलो” असं आर्या निक्कीच्या आईला म्हणाली.
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
आर्या पुन्हा बिग बॉसच्या घरात जाणार का?
आर्याने या लाइव्ह सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंही दिली. यावेळी तिला एका चाहत्याने पुन्हा बिग बॉसमध्ये जाणार का? असं विचारलं. त्यावर आर्याने उत्तर दिलं. “नक्कीच पुन्हा बिग बॉसमध्ये जाईन,” असं आर्या म्हणाली. आर्या सध्या तरी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे, पण पुन्हा तिला या पर्वात संधी दिली जाणार की नाही, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”
आर्या जाधवला निक्कीला मारल्याप्रकरणी बिग बॉसने घरातून निष्कासित केलं. आर्याने केलेल्या कृतीनंतर सोशल मीडियावर काही चाहते आर्याचं समर्थन करताना दिसले होते, तर काहींनी या कृतीचा निषेध केला होता. “मी हात उचलणे ही कृती योग्य नव्हती. ती एकप्रकारची हिंसा आहे,” असं आर्याने या लाइव्ह सेशनमध्ये म्हटलं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd