Aata Hou De Dhingana New promo: काही शो प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करतात. खळखळून हसवतात, त्यातील काही टास्कमुळे तर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला लागलेली असते. मग ‘लाफ्टर शेफ’ हा हिंदी शो असो किंवा ‘आता होऊ द्या धिंगाणा’ हा शो असो, प्रेक्षकांचा अशा कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आता होऊ दे धिंगाणा’ हा लोकप्रिय शो आहे. या शोला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. सध्या या कार्यक्रमाचा चौथा सीझन सुरू आहे. या कार्यक्रमात स्टार प्रवाह वाहिनींवरील मालिकांमधील कलाकार सहभागी होतात. दोन मालिकांचे कलाकार एकाच वेळी सहभागी होतात.

अशावेळी कलाकारांना अनेक टास्क दिले जातात. अनेक गमती जमती घडताना दिसतात. चुकल्यानंतर त्यांना गमतीशीर शिक्षादेखील दिल्या जातात. कलाकार त्यांचे विविध कलागुणदेखील सादर करतात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव करतो. तो त्याच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमात एक वेगळीच ऊर्जा आणतो.

अभिनेत्री सुकन्या मोने सादर करणार लावणी

आता स्टार प्रवाह वाहिनीने आता होऊ दे धिंगाणाचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ आणि ‘हळद रुसली, कुंकू हसलं’ या मालिकांतील कलाकार सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ फेम कावेरी आणि ‘हळद रुसली, कुंकू हसलं’मधील कृष्णा लावणी सादर करत आहेत. त्या डान्स करत असतानाच ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ फेम सुलू मांदेखील त्यांना साथ देत असल्याचे पाहायला मिळते. त्यांच्या अदा आणि त्यांचे नृत्य यांमुळे त्या लक्ष वेधून घेत आहे.

‘आम्ही नाही जा’ या गाण्यावर या अभिनेत्री लावणी सादर करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, “कृष्णा व कावेरीच्या लावणीला मिळणार सुलू मांच्या अदाकारीचा झणझणीत तडका”, अशी कॅप्शन दिली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

आणखी एका प्रोमोमध्ये पाहायला मिळते की टीममधील कलाकारांनी चुकीची उत्तरे दिल्यानंतर यश व दुष्यंतला विजेचे झटके मिळतात. ते ओरडतानादेखील दिसत आहे.

दरम्यान, आता आता होऊ दे धिंगाणामध्ये आणखी काय गमती जमती घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.