Bigg Boss 19: बिग बॉस हा लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. या शोमध्ये विविध क्षेत्रांतील व्यक्ती स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या आहेत. अबू मलिक यांचा पुतण्या व डब्बू मलिक यांचा मुलगा अमाल मलिकदेखील बिग बॉसच्या १९ व्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे.
संगीतकार अबू मलिक यांनी अमाल मलिकबाबत वक्तव्य केले आहे. अबू मलिक स्वत: बिग बॉसच्या १३ व्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. त्या पर्वाचा विजेता दिवगंत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाबद्दलदेखील अबू मलिक यांनी वक्तव्य केले.
“ती लवकर बिग बॉसबाहेर येणार….”
अबू मलिक यांनी नुकतीच ‘गल्लाटा इंडिया’ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांना अमाल मलिकच्या खेळाविषयी विचारण्यात आले. त्यावर अबू मलिक म्हणाले,”४-५ दिवसांपासून मला त्याचा खेळ आवडत आहे. तो आता खुलेपणानं खेळत आहे. गेल्या आठवड्यात सलमाननं त्याला समजावल्यानंतर तो आता चांगलं खेळू लागला आहे. मला वाटतं की, बिग बॉसला असं कोणीतरी पाहिजे आहे, जी व्यक्ती घर स्थिरपणे सांभाळू शकेल. अमाल, गौरव बिग बॉसचे घर नीट हाताळत आहेत. व्यवस्थित खेळत आहेत.”
घरातील इतर सदस्यांबाबत अबू मलिक म्हणाले, “कुनिका खूप चांगला खेळ खेळत आहे. ती लवकर बिग बॉसबाहेर येणार नाही. ती खूप काळपर्यंत या खेळात टिकून राहील. आवेज खूप संवदेनशील आहे. त्याचा खेळ मला आवडतो. काही वेळा मला बसीर, अमाल, तान्या, फरहाना यांचाही खेळ आवडतो.”
बिग बॉस १९ च्या घरातील अनेक स्पर्धक त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे आहे, हे सांगण्यासाठी बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे नाव घेतात. त्याबाबत अबू मलिक म्हणाले, “बिग बॉस १९मधील कोणताही स्पर्धक सिद्धार्थसारखा असू शकत नाही. त्याच्यासारखं कोणीही नाहीये. त्याच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर होतं. त्या शोमध्ये त्याची खूप छान लव्हस्टोरी होती. त्यानं खूप सुंदररीत्या ते सर्व सांभाळलं.”
अबू मलिक असेही म्हणाले, “सिद्धार्थ शुक्ला हा माझा जवळचा मित्र होता. त्याच्या निधनानंतर तसेच, शेफाली जरीवालाच्या अचानक निधनाचा धक्का बसला होता. मी सिद्धार्थच्या घरी जायचो. त्या निधनानंतर खूप वाईट वाटलं होतं. बिग बॉस १३ सारखा दुसरा कोणताच सीझन होऊ शकत नाही. देवानं स्क्रिप्ट लिहिली आहे आणि तोच त्याचं शूटिंग करणार आहे.”
दरम्यान, बिग बॉसच्या १९ व्या पर्वातील सर्वच स्पर्धक प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असल्याचे दिसत आहे. प्रत्येक स्पर्धकाची काहीतरी खासियत आहे. नुकतेच नगमा मिराजकर आणि नतालिया हे दोन स्पर्धक घराबाहेर पडले आहेत.