Aishwarya And Avinash Narkar Dance Video : लोकगीतं हा महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्राला लोकगीतं व नाट्यसंगीताचा समृद्ध इतिहास व अमूल्य वारसा लाभला आहे. आजही प्रत्येक समारंभात ही लोकगीतं आवर्जून गायली जातात. नुकताच मराठी मनोरंजन विश्वातील ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या एव्हरग्रीन जोडीने एका प्रसिद्ध लोकगीतावर डान्स केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी या जोडप्याचं भरभरून कौतुक केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऐश्वर्या व अविनाश नारकर यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. मराठी नाटक, चित्रपट व मालिकांमध्ये या जोडप्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या ही जोडी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. विविध ट्रेडिंग व लोकप्रिय गाण्यांवर नारकर जोडपं जबरदस्त डान्स करताना दिसतं. नुकताच या दोघांनी मराठी लोकगीतावर डान्स केला आहे.

हेही वाचा : तीन वर्षांपूर्वी बिझनेसमनशी गुपचूप बांधली लग्नगाठ, प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई, फोटो शेअर करत म्हणाली…

ऐश्वर्या व अविनाश नारकर यांचा डान्स ( Aishwarya And Avinash Narkar )

ऐश्वर्या यांनी साडी नेसून तर, अविनाश यांनी पांढऱ्या रंगाचा सदरा घालून एका प्रसिद्ध लोकगीतावर डान्स केला आहे. ‘तुळजाभवानी आई’ असं कॅप्शन देत “गणबाई मोगरा गणाची साडी…” या लोकप्रिय मराठी लोकगीतावर नारकर जोडप्याने जबरदस्त डान्स केला आहे. ऐश्वर्या व अविनाश यांच्या या डान्स व्हिडीओला अवघ्या २४ तासांत ३ लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. याशिवाय नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

हेही वाचा : Phir Aayi Hasseen Dillruba : “जो पागलपन की हदसे ना गुजरे..”, ‘फिर आयी हसीन दिलरुबा’चा दमदार ट्रेलर

ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी “एव्हरग्रीन जोडी”, “तुम्ही एक कलाकार म्हणूनच मोठे नाहीतर एक माणूस म्हणून पण खूप महान आहात”, “भारीच झालंय हे”, “खूप छान”, खूप “छान वाटतं तुम्हा दोघांना बघून”, “आई तुळजाभवानीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहुदे” अशा कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा : Kangana Ranaut First Loksabha Speech: अभिनेत्री कंगना रणौतचं लोकसभेत पहिलं भाषण; कोणते मुद्दे मांडले? पाहा Video!

ऐश्वर्या व अविनाश नारकर ( Aishwarya And Avinash Narkar Dance )

दरम्यान, या जोडप्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ऐश्वर्या नारकर सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेत रुपाली हे नकारात्मक पात्र साकारत आहेत. तर, अविनाश नारकर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘डंका’ चित्रपटात झळकले होते. प्रेक्षक या एव्हरग्रीन ऑफस्क्रीन जोडीला ( Aishwarya And Avinash Narkar ) पुन्हा एकदा ऑनस्क्रीन एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya and avinash narkar dance on marathi lokgeet of maharashtra video viral sva 00
Show comments