Aishwarya Narkar Dance Video : मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या नारकर यांना ओळखलं जातं. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. या वयातही ऐश्वर्या नारकर यांनी आपला फिटनेस उत्तम प्रकारे जपला आहे. अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावरील विविध ट्रेडिंग गाण्यांवर ऐश्वर्या नारकर रील्स बनवत असतात. त्यांनी नुकताच शेअर केलेला एक डान्स व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर एखादं गाणं व्हायरल झाल्यावर सगळ्या नेटकरी त्यावर रील्स बनवू लागतात. जुलै २०२४ मध्ये लोकप्रिय गायक दर्शन रावल याचं Jeeja हे गाणं प्रदर्शित झालं. सध्या या गाण्यातील हूकस्टेपची सर्वत्र चर्चा रंगली आहे. ऐश्वर्या नारकरांनी ( Aishwarya Narkar ) सुद्धा या ट्रेंडनुसार खास व्हिडीओ बनवला आहे.

हेही वाचा : Video : अक्षया देवधरचा नवीन व्यवसाय! पाठकबाईंचं ‘भरजरी’ दालन सुरू होणार, शेअर केली पहिली झलक

ऐश्वर्या नारकर यांचा जबरदस्त डान्स ( Aishwarya Narkar )

ऐश्वर्या नारकरांनी दर्शन रावलच्या या व्हायरल हिंदी गाण्यावर साडी नेसून डान्स केला आहे. यामध्ये अभिनेत्री अमृता रावराणेने ऐश्वर्या यांना साथ दिली आहे. दोघींनीही साडी नेसून, नाकाथ नथ, हातात चुडा असा मराठमोळा साज करत या व्हायरल गाण्यावर डान्स केला आहे.

ऐश्वर्या यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर अभिनेत्री या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिते, “गाण्याच्या हूकस्टेपपेक्षा तुम्ही डान्स करताना किती मजा किती करता ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे.”

हेही वाचा : Video : अमेरिकेहून सुट्टी एन्जॉय करून लाडक्या लेकीसह मुंबईत परतील ऐश्वर्या राय-बच्चन, नेटकरी म्हणाले, “ही शाळेत जात नाही का?”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : आता थेट ‘बिग बॉस’ करणार सूरजचा ब्रेनवॉश! ‘गुलीगत किंग’ म्हणत निक्कीला भिडणार, पाहा प्रोमो

ऐश्वर्या नारकर व अमृता रावराणे ( फोटो सौजन्य : aishwarya narkar इन्स्टाग्राम )

दरम्यान, ऐश्वर्या यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या त्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत रुपाली हे खलनायिकेचं पात्र साकारत आहे. त्या सेटवर सुद्धा अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ बनवून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. याशिवाय ‘या सुखांनो या’, ‘स्वामिनी’, ‘लेक माझी लाडकी’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये ऐश्वर्या यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. त्यांनी साकारलेल्या जुन्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya narkar dances on darshan raval viral trending song watch video sva 00