Aishwarya Narkar Shared A Video On The Ocassion Of Deep Amavasya : ऐश्वर्या नारकर या मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. सोशल मीडियावरही त्या प्रचंड सक्रिय असतात. त्यांच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी त्या यामार्फत शेअर करत असतात. अशातच आज दीप अमावस्येनिमित्त त्यांनी खास व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी त्यांनी खास तयारी केल्याची पाहायला मिळतं.

ऐश्वर्या नारकर अनेकदा सणावारांच्या दिवशी त्यांच्या घरातील फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असतात. आजही त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये त्या अमावस्येच्या पूजेची तयारी करताना दिसत आहेत. त्या यावेळी पारंपरिक पद्धतीने तयार झाल्याचंही यामधून पाहायला मिळतं. यावेळी त्यांनी जांभळ्या रंगाची साडी नेसली असून हिरव्या बांगड्या व केसात गजरा माळल्याचंही दिसतं.

ऐश्वर्या यांनी या व्हिडीओला “दीप अमावस्या शुभेच्छा तुमच्या आयुष्यात सतत प्रकाश राहू दे” अशी खास कॅप्शन दिली आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या देवघरात व त्या ठिकाणी छान दिव्यांची आरास व फुलांची सजावट केल्याचं या व्हिडीओमधून पाहायला मिळतं. त्यांनी एका ताटात वेगवेगळ्या प्रकारचे दिवे ठेवले असून त्यांना फुलांची सजावट केली आहे. अशारितीने ऐश्वर्या यांनी घरी पारंपरिक पद्धतीने दीप अमावस्येची पूजा केली आहे.

ऐश्वर्या नारकर या अनेकदा सोशल मीडियामार्फत त्यांचे पती व अभिनेते अविनाश नारकर यांच्यासहदेखील सणांच्या दिवशी व्हिडीओ पोस्ट करत असतात. याव्यतिरिक्त अनेकदा हे दोघे कॉमेडी रीलही शेअर करत असतात. दोघांचाही सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर शेवटचं त्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत झळकल्या होत्या. यामध्ये त्यांनी खलनायिकेची भूमिका साकारली होती. यानंतर त्या अद्याप नवीन प्रोजेक्टमधून दिसल्या नाही, त्यामुळे प्रेक्षक आता त्यांना नवीन भूमिकेतून पाहण्यासाठी उत्सुक आहेत.