Laughter Chefs 2: ‘कलर्स टीव्ही’ वाहिनीवरील ‘लाफ्टर शेफ्स २’ शोची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसांपूर्वी शोमध्ये जुन्या कलाकारांची एन्ट्री झाली. अली गोनी, रीम शेख आणि निया शर्मा हे जुने चेहर पुन्हा एकदा ‘लाफ्टर शेफ्स २’मध्ये पाहायला मिळत आहेत. आता अली गोनीची गर्लफ्रेंड जास्मिन भसीनची ( Jasmine Bhasin ) लवकरच शोमध्ये एन्ट्री होणार असून ती एका जुन्या कलाकाराची घेणार आहे.
‘लाफ्टर शेफ्स २’ शो १ एप्रिलला संपणार होता. पण प्रेक्षकांचा मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून शो पुढे वाढवण्यात आला. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टनुसार मनारा चोप्राने हा शो सोडला आणि तिच्या जागी निया शर्माची एन्ट्री झाली. नंतर मग अली गोनी व रीम शेखर ही नवी जोडी शोमध्ये सामिल झाली. आता ‘इंडिया फोर्म्स’च्या माहितीनुसार, राहुल वैद्य काही कमिटमेंटमुळे शोचे आगामी एपिसोडचे चित्रीकरण करू शकणार नाही. त्यामुळे त्या एपिसोडसाठी जास्मिन भसीन ( Jasmine Bhasin ) राहुलची जागा घेणार आहे.
‘लाफ्टर शेफ्स २’ मध्ये राहुल वैद्य आणि रुबीना दिलैक अशी जोडी होती. पण आता काही एपिसोडसाठी रुबीना आणि जास्मिनीची जोडी पाहायला मिळणार आहेत. ‘बिग बॉस १४’च्या घरात जास्मिन आणि रुबीनाचं नातं काही ठीक नव्हतं. सुरुवातीला दोघी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. पण, ‘बिग बॉस’मध्ये जशी अलीची एन्ट्री झाली तशी जास्मिन ( Jasmine Bhasin ) आणि रुबीनाच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला. ‘बिग बॉस’च्या या पर्वाच्या अखेरीस दोघांचे बरेच वाद झाले होते. त्यामुळे आता ‘लाफ्टर शेफ्स २’ मध्ये दोघीं एकत्र स्वयंपाक कसा करणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
दरम्यान, ‘लाफ्टर शेफ्स २’मध्ये काही कलाकार सोडले तर बरेच नवे चेहरे पाहायला मिळत आहेत. रुबीना दिलैक, एल्विश यादव, अभिषेक कुमार, समर्थ जुरेल, मन्नारा चोप्रा, अब्दु रोजिक हे सहा जण ‘लाफ्टर शेफ्स सीझन २’मध्ये झळकले. पण अब्दु रोजिक आणि मन्रारा चोप्राने या शोला रामराम केला. त्यामुळे नियाच्या आधी अब्दु रोजिकच्या जागी करण कुंद्राची एन्ट्री झाली.