छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करुन लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेने चित्रपटांतही अभिनयाचा ठसा उमटवला. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे अंकिता प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने साकारलेली अर्चना ही भूमिका प्रेक्षकांना भावली होती. अंकिताबरोबर ‘पवित्रा रिश्ता’मध्ये बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतनेही मुख्य भूमिका साकारली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पवित्र रिश्ता’ मालिकेत सुशांत सिंह राजपूत मानवच्या भूमिकेत होता. मालिकेतील अर्चना व मानवची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यांच्या या जोडीला प्रेक्षकांकडून विशेष प्रेम मिळालं. २००९ साली प्रसारित झालेल्या या मालिकेला आज १४ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने अंकिताने तिच्या सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ‘पवित्रा रिश्ता’ मालिकेतील अर्चनाचे काही फोटो या व्हिडीओमध्ये शेअर करत मालिकेचं टायटल साँग तिने दिलं आहे.

हेही वाचा>> “ओंकार भोजने ग्रेट आहे”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “त्याच्याबरोबर…”

अंकिताने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये फक्त अर्चना दिसत असल्याने चाहते नाराज आहेत. मानवच्या भूमिकेत असलेल्या सुशांत सिंह राजपूतचा फोटो अंकिताने शेअर केलेल्या या व्हिडीओत नसल्याने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संतप्त कमेंट केल्या आहेत. “मानवशिवाय पवित्र रिश्ता अपूर्ण आहे,” अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “सुशांत सिंह राजपुतचं नाव तू घ्यायला हवं होतंस,” असंही एकाने म्हटलं आहे.

“मानवला पण अॅड करायला हवं होतं,” असंही एकाने म्हटलं आहे. “मानवचे क्लिप्सही टाक,” अशी कमेंटही केली आहे.

हेही वाचा>> छत्रपती शिवाजी महाराजांना फोन करण्याची राज ठाकरेंची इच्छा, म्हणाले, “महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला…”

“मानवला दाखवायचं नव्हतं तर पवित्र रिश्ताची पोस्टही टाकायला नको हवी होतीस. मानवशिवाय ही मालिक अपूर्ण आहे,” अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. “मालिकेत मानवही होता. फक्त अर्चनाने मालिका केली नाही,” असं म्हणत अंकिताला ट्रोल केलं आहे.

‘पवित्रा रिश्ता’मुळे अंकिता व सुशांत सिंह राजपूतमध्ये जवळीक वाढली होती. त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चाही रंगल्या होत्या. परंतु, काही कारणांमुळे ते वेगळे झाले. त्यानंतर अंकिताने २०२१मध्ये व्यावसायिक विकी जैनशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankita lokhande shared special post for 14 years of pavitra rishta not mentioned sushant singh rajput netizens react kak