छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेला ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम पुन्हा सुरू होत आहे. या कार्यक्रमाचे दुसरे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार असून शोमध्ये हजेरी लावणाऱ्या पाहुण्यांना तो बोलतं करणार आहे.

‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमातील त्यांच्या काही क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता झी मराठीच्या ऑफिशियल पेजवरुन ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमातील राज ठाकरेंचा आणखी एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना फोन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

हेही वाचा>> ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार, कधी आणि कुठे? जाणून घ्या

‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमातील या व्हिडीओमध्ये अवधूत गुप्ते राज ठाकरेंना “हा जादूचा फोन डायरेक्ट कनेक्ट होईल. तुमच्या मनातील व्यक्तीला तो आपोआप लागणार आहे,” असं म्हणतो. यावर राज ठाकरे म्हणतात, “मला छत्रपती शिवाजी महाराजांशी बोलायचं आहे. त्यांनी पुन्हा महाराष्ट्रात अवतरावं आणि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला तुम्ही कशासाठी झगडलात हे सांगावं, अशी माझी इच्छा आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवधूत गुप्तेचा ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम येत्या ४ जूनपासून प्रसारित होणार आहे. झी मराठी वाहिनीवर दर रविवारी रात्री ९ वाजता हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही हजेरी लावणार आहेत.