गेल्यावर्षी गणेशोत्सवात ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणं सगळीकडे वाजलं गेलं. या गाण्याने अक्षरशः सगळ्यांना वेडं लावलं होतं. हे गाणं अधिक लोकप्रिय झालं ते म्हणजे साईराज केंद्रेमुळे ( Sairaj Kendre ). साईराजने या गाण्यावर केलेला डान्स व हावभावाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ गाण्यावरील त्याचा व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर साईराज अधिक प्रसिद्धीच्या झोतात आला. एवढंच नाहीतर त्यांची थेट ‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका ‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये एन्ट्री झाली. अशा या लोकप्रिय बालकलाकाराचं आता नवं गाणं प्रदर्शित झालं आहे.

‘गणुल्या माझा दिसतोय छान…’ असं बोबडे बोल असलेलं साईराज केंद्रेचं ( Sairaj Kendre ) गाणं २४ ऑगस्टला प्रदर्शित झालं आहे. या गाण्यातल्या साईराजच्या डान्स व निरागस हावभावाने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सागर नवले यांनी हे गाणं लिहिलं असून संगीतबद्ध देखील केलं आहे. विशेष म्हणजे गाण्यात पाहायला मिळणाऱ्या साईराज व तन्वी पाटीलने गाणं गायलं आहे.

हेही वाचा – Bigg Boss Marathi : पहिल्याच आठवड्यात बेघर झालेल्या पुरुषोत्तमदादा पाटलांना भेटण्यासाठी जपानी चाहत्याने थेट गाठली आळंदी, पाहा व्हिडीओ

साईराज केंद्रेच्या ( Sairaj Kendre ) या नव्या गाण्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. “अतिशय सुंदर”, “खूप छान गाणं आहे”, “साईराज खूपच सुंदर गाणं आहे. तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा…”, “खूपच छान सादरीकरण”, “एकच नंबर”, “लय भारी”, “साईराज खूपच छान”, “खूप गोड आवाज आहे”, “व्वा कमाल”, “अप्रतिम गाणं”, अशा अनेक प्रतिक्रिया युट्यूब युझरच्या उमटल्या आहेत. ‘गणुल्या माझा दिसतोय छान…’ साईराजच्या या नव्या गाण्याला आतापर्यंत ५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर ७०० हून अधिक लोकांनी लाइक केलं आहे.

साईराज केंद्रेचं नवं गाणं पाहा

हेही वाचा – Video: अभिजीत सावंतने रॅपिड फायर खेळताना दिली जबरदस्त उत्तरं, म्हणाला, “‘बी’ टीममधून आर्याला बाहेर काढून…”

दरम्यान, साईराज केंद्रे ( Sairaj Kendre ) सध्या ‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका ‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये पाहायला मिळत आहे. या मालिकेत जेव्हा सात वर्षांचा लीप आला तेव्हा साईराजची एन्ट्री झाली होती. अप्पीचा मुलगा अमोलची उर्फ सिम्बाची भूमिका त्याने साकारली आहे. साईराजची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. त्याच्या अभिनयाचं नेहमी कौतुक होतं असतं.