Ashok Mama Serial Fame Actress Engagement : गेल्या काही महिन्यांत मराठी इंडस्ट्रीमधील काही सेलिब्रिटींनी लग्नगाठी बांधल्या; तर काहींनी आपल्या रिलेशनशिपची कबुली दिल्याचं पाहायला मिळालं. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या वैयक्तिक आयुष्यातील आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली. अशातच काही दिवसांपासून एका मराठी अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा सुरू होती.
ही अभिनेत्री म्हणजे रसिका वखारकर. छोट्या पडद्यावरील ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ या मालिकेतून रसिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेतील तिची भूमिका खूपच गाजली आणि रसिका घराघरात पोहोचली. आपल्या अभिनयानं चर्चेत राहणारी रसिका काही दिवसांपासून तिच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत होती.
अभिनेत्रीनं सोशल मीडियावर एका व्यक्तीसह फोटो शेअर केला होता आणि या फोटोसह तिनं, “एक नवीन सुरुवात… काय आहे Guess करा… Love In The Air”, असं म्हटलं होतं. या पोस्टद्वारे तिनं तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. तेव्हापासून तिच्या फोटोमधील ही व्यक्ती कोण आहे? याविषयीची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली होती. अशातच आता चाहत्यांची ही उत्सुकता संपली आहे.
रसिकानं आयुष्यातील या खास व्यक्तीचा खुलासा केला आहे. नुकताच तिचा साखरपुडा सोहळा पार पडला आहे. अगोदरच्या काही फोटोंमधून रसिकानं ज्या व्यक्तीचा चेहरा लपवला होता, ती व्यक्ती आता समोर आली आहे. त्याचं नाव आहे शुभांकर उंबराणी. रसिका आणि शुभांकर या दोघांचा साखरपुडा सोहळा नुकताच पार पडला आहे. रसिकानं सोशल मीडियावर होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे खास फोटो शेअर केले आहेत. तसंच खास फोटोंसह ‘माझ्या खऱ्या आयुष्यातला प्लस वन’, अशी कॅप्शन देत तिनं साखरपुडा झाल्याचं जाहीर केलं आहे.
रसिकाने याआधी शेअर केलेल्या फोटोंमधून तिच्या जोडीदाराचा चेहरा दिसत नसल्यानं चाहत्यांकडून अनेक तर्क-वितर्क केले जात होते. तसंच हा व्यक्ती नक्की कोण आहे? याबद्दलही विचारणा केली जात होती; आता या सगळ्या तर्क-वितर्कांना आणि चर्चांना पूर्णविराम लागला आहे. रसिकानं स्वत:च पोस्ट शेअर करीत याबद्दलची गुड न्यूज दिली आहे.
रसिका वखारकर इन्स्टाग्राम पोस्ट
रसिकानं शेअर केलेल्या तिच्या साखरपुड्याच्या खास फोटोवर सुयश टिळक, ऋतुजा बागवे, योगिता चव्हाण, सानिया चौधरी, सीमा घोगळे, कांचन शिंदे, शुभवी गुप्ते, ऋचा गायकवाड, कश्मिरा कुलकर्णी यांसह अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसंच रसिकाच्या चाहत्यांनीही दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, रसिकाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ या लोकप्रिय मालिकेनंतर ती सध्या कलर्स मराठीवरीलच ‘अशोक मा. मा.’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफही मुख्य भूमिकेत आहेत.