‘बिग बॉस १६’ या शोमध्ये सहभागी झालेला शिव ठाकरे सध्या चांगलेच चर्चेत आहे. शिवा ‘बिग बॉस’ मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला. या शोमुळेच तो प्रसिद्धीच्या झोतात आला. ‘बिग बॉस’ मराठी करत असताना अभिनेत्री वीणा जगतापवर आपलं प्रेम असल्याचं त्याने शोमध्येच जगजाहिर केलं. हा शो संपल्यानंतर शिव-वीणा काही काळ एकत्र राहिले. पण त्यानंतर दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आला असल्याची चर्चा होती. आता ‘बिग बॉस १६’मध्ये शिव एका नव्या स्पर्धकाच्या प्रेमात पडला असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेल्या साजिद खानला बहीण फराह खानचा पाठिंबा? सलमान खानला म्हणते…

‘बिग बॉस १६’मध्ये सध्या स्पर्धकांमध्ये प्रेमाचे रंग पाहायला मिळत आहेत. शालिन भानोत व टीना दत्ता, गौतम विज व सौंदर्य शर्मा ही दोन जोडपी एकमेकांच्या जवळ येताना दिसत आहेत. तर दुसरीकडे शिव व सुंबुल तौकीरमध्ये जवळीक वाढत आहे. सुंबुल तौकीर याआधी शालिन भानोतच्या मागे फिरताना दिसली. तिला समजावण्यासाठी गेल्या आठवड्यामध्ये तिच्या वडिलांना बोलावण्यात आलं होतं. पण अजूनही काय करायचं हे सुंबुलला समजलं नसल्याचं दिसत आहे.

घराचा नवा कॅप्टन शिवबरोबरचे तिचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शिव-सुंबुल डान्स करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या व्हायरल व्हिडीओमध्ये दोघं एका सोफ्यावर बसून गप्पा-गोष्टी करताना दिसत आहेत.

दोघांच्या या व्हायरल व्हिडीओवरून शिव-सुंबुकमध्ये जवळीक वाढत असल्याचं प्रेक्षक म्हणत आहेत. तसेच ‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये आणखी एक जोडपं तयार होत असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. आता खरंच हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत का? हे काही दिवसांमध्येच स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big boss 16 shiv thakare sumbul touqeer new pair in the house video goes viral on social media see details kmd