Bigg Boss 18 First Elimination : टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस 18’ सुरू होऊन एक आठवडा झाला आहे. मागच्या आठवड्यात ६ ऑक्टोबर रोजी हा शो सुरू झाला. या पर्वात १९ स्पर्धक सहभागी झाले, ज्यामध्ये टीव्ही कलाकार, बॉलीवूड सेलिब्रिटी, राजकारणी आणि वकील यांचा समावेश आहे. आता तुम्ही विचार करत असाल की शोमध्ये फक्त १८ लोक दिसत आहेत, मग १९ वं कोण? तर शोच्या भव्य प्रीमियरमध्ये सलमान खानने १९ व्या स्पर्धकाची म्हणजेच गधराजचीही ओळख करून दिली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा गधराज म्हणजे बिग बॉसच्या घरात इतर स्पर्धकांबरोबर सहभागी झालेला गाढव आहे. या गाढवामुळे घरात वेगळंच वातावरण पाहायला मिळालं. शोच्या पहिल्या दिवसापासून घरात अनेक स्पर्धकांची ‘गधराज’बरोबर चांगली बाँडिंगही दिसून आली. आता मात्र पहिल्या आठवड्यात ‘गधराज’ बेघर झाले आहेत.

हेही वाचा – अरबाज पटेलच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल थेट ‘तो’ प्रश्न विचारल्यावर निक्की तांबोळी म्हणाली, “ते दोघेही…”

गाढवामुळे निर्माते आलेले अडचणीत

काही दिवसांपूर्वी पेटा इंडियाने शोच्या निर्मात्यांना व सलमान खानला पत्र लिहून गाढवाला त्या घरातून बाहेर काढण्याची विनंती केली होती. आता निर्मात्यांनी ती विनंती मान्य केली असून गाढवाला घराबाहेर काढण्यात आलं आहे. ‘पीपल फॉर ॲनिमल्स’ नावाच्या एनजीओने शोच्या निर्मात्यांची टीका करत त्यांच्यावर प्राण्यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. निर्माते त्यांच्या मनोरंजनासाठी गाढवाला अशा कठीण परिस्थितीत घरात ठेवत आहेत, असा आरोप त्यांनी केला होता.

हेही वाचा – ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे, काय करतो? अंकिता वालावलकरच्या होणाऱ्या पतीबद्दल जाणून घ्या

गाढव आले घराबाहेर

आता पीएफएने आपल्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली असून ‘गधराज’ला बिग बॉसच्या घरातून काढण्यात आल्याची माहिती दिली आहे. पोस्टमध्ये त्यांनी मेनका गांधी यांचे आभार मानले आहे. या प्रकरणात हस्तक्षेप केल्याबद्दल पीपल फॉर ॲनिमल्सच्या अध्यक्षा मनेका संजय गांधी यांचे आभार. गाढवाच्या सुटकेची मागणी करणाऱ्या लोकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे यश मिळाले, असंही त्यात लिहिलंय.

हेही वाचा – Video: “तू माझी हिरोईन आहेस”, सूरज चव्हाणला भेटायली आली ‘ती’; नेटकरी म्हणाले, “हीच आमची वहिनी शोभेल”

पहिल्या एलिमिनेशनमधून सुरक्षित झालेले स्पर्धक

पहिल्या आठवड्यातच बिग बॉसने घरात एक नॉमिनेशन टास्क ठेवला होता, ज्यामध्ये सर्व घरातील सदस्यांनी एकमेकांना नॉमिनेशन केले होते. यानंतर चाहत पांडे, अविनाश मिश्रा, गुणरत्न सदावर्ते, करणवीर मेहरा आणि मुस्कान बामणे नॉमिनेट झाले होते. मात्र १९ वा सदस्य ‘गधराज’ला बाहेर काढल्यानंतर या आठवड्यात नॉमिनेटेड सदस्यांना सुरक्षित करण्यात आलंय.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 first elimination gadharaj donkey eliminated after peta letter to makers hrc