Bigg Boss 19 Wild Card Entry : छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा शो प्रेक्षकांचं उत्तम रीतीनं मनोरंजन करीत आहे. गेल्या महिन्यात ‘बिग बॉस’चं १९ वं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं. जसजशी स्पर्धा पुढे जात आहे, तशी ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांमधील भांडणं वाढत चालली आहेत.
तसंच ‘बिग बॉस १९’मधून एकामागोमाग एक सदस्य एलिमिनेट होत आहेत. आतापर्यंत तिघांना या घरातून बाहेर जाण्याचा मार्ग पत्करावा लागला आहे. सुरुवातीला स्पर्धकांमध्ये जी मैत्री दिसत होती, ती आता ‘एलिमिनेशन’च्या म्हणजेच बाहेर जावे लागण्याच्या भीतीमुळे तुटू लागली आहे. काही स्पर्धक आता आपल्याच जवळच्या व्यक्तींविरुद्ध उभे राहिल्याचं पाहायला मिळत आहे. जसे या शोमधून काही स्पर्धक निघून जात आहेत, तसंच काही नवे स्पर्धक या घरात येणार आहेत.
‘बिग बॉस १९’मध्ये लवकरच वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे नवा स्पर्धक येणार असल्याची चर्चा सुरू आहे आणि त्या स्पर्धकाचं नाव आता समोर आलं आहे. एका प्रसिद्ध क्रिकेटपटूची बहीण ‘बिग बॉस १९’मध्ये वाइल्ड कार्ड म्हणून येणार असल्याची चर्चा सुरू आहे.
क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण ‘बिग बॉस १९’मध्ये?
NDTV ने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेटपटू दीपक चहर याची बहीण मालती लवकरच ‘बिग बॉस १९’मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून येणार आहे. स्वतः दीपक आपल्या बहिणीला ‘बिग बॉस’च्या घरात सोडायला येणार आहे, असं म्हटलं जात आहे. मात्र, अजून दीपक किंवा ‘बिग बॉस’कडून मालतीच्या ‘बिग बॉस’मधील वाइल्ड कार्ड एन्ट्रीबद्दल कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मालती चहरची इन्स्टाग्राम पोस्ट
जर मालतीनं खरोखरच घरात प्रवेश केला, तर घरातील सगळं वातावरणच बदलून जाईल. तसेच, शोचा टीआरपीही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात आवेज दरबार घरातून बाहेर पडला आणि त्यानंतर घरातील परिस्थिती एकदम बदलली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात टास्कवरून स्पर्धकांमध्ये अनेक भांडणं आणि वाद होत असल्याचं पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या भागात पुन्हा बसीर अली आणि प्रणीत मोरे यांच्यात वाद झाला. बसीरनं पुन्हा प्रणीतला तुला घराबाहेर काढणार असल्याचा थेट इशारा दिला. घरातील कॅप्टन्सी टास्कदरम्यान दोघे पुन्हा एकदा एकमेकांशी भांडले.