यंदा बिग बॉसचे चौथे पर्व विविध कारणांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. हे पर्व सुरु झाल्यापासून त्यात दिवसेंदिवस येणारे ट्विस्ट, स्पर्धकांचे मतभेद, कामांवरुन होणारे वाद आणि त्यांचा खेळ यावरुन बिग बॉसचे चौथे पर्व गाजताना दिसत आहे. यंदा बिग बॉसचे पर्व ऑल इज वेल या थीमवर आधारित आहे. बिग बॉसच्या घरात नुकतंच एका वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एंट्री झाली आहे. हा स्पर्धक नक्की कोण याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत होती. अखेर त्याचा खुलासा झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिग बॉसच्या घरात एकूण १६ स्पर्धक सहभागी झाले. त्यात दोन आठवड्यानंतर अभिनेता निखिल राजेशिर्केला घराबाहेर पडावे लागेल. त्यानंतरच्या आठवड्यात अभिनेत्री मेघा घाडगे घराबाहेर पडली. त्यानंतर काल आठवड्यात योगेश जाधवला घराबाहेर पडावे लागेल. त्यातच आता एक वेगळा ट्विस्ट या कार्यक्रमात पाहायला मिळाला. बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री होणार असल्याचे महेश मांजरेकरांनी जाहीर केले.
आणखी वाचा : “आज शेवटचा भाग चित्रीत झाला अन्…” आदेश बांदेकरांच्या लेकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

या पहिली झलक सर्वांसमोर आली होती. अतिशय बोल्ड अंदाजात डान्स करणाऱ्या या स्पर्धकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. ही सदस्य नेमकी कोण? याबद्दल अनेकजण अंदाज लावताना दिसत होते. अखेर ती सदस्य नेमकी कोण याचा उलगडा झाला आहे. मराठी अभिनेत्री स्नेहलता वसईकर बिग बॉस मराठीच्या घरात यंदाच्या पर्वाची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री करणारी स्पर्धक ठरली आहे.

आणखी वाचा : ‘तू कुणाची लायकी काढतोस?’ महेश मांजरेकरांनी किरण मानेंना खडसावले

स्नेहलता वसईकरच्या येण्याने बिग बॉसच्या घरातील समीकरण किती बदलणार? नात्यांमध्ये काय बदल होणार ? कोण घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत येईल आणि कोण सेफ होईल ? कोण होईल घराचा नवा कॅप्टन? यासारखे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. त्यामुळे येणारा आठवडा खूप आव्हानात्मक आणि उत्कंठावर्धक असणार असल्याचे बोललं जात आहे.

दरम्यान स्नेहलता वसईकर ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनेक मराठी मालिकांमुळे ती घराघरांत पोहचली. तिचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेमध्ये तिने ‘सोयरा बाईसाहेब’ ही भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळेच ती प्रसिद्धीझोतात आली. तिची ही भूमिका प्रचंड गाजली. आजही तिला याच भूमिकेमुळे प्रेक्षक ओळखतात. ऐतिहासिक भूमिका साकारत असतानाही अनेकदा बोल्ड फोटोशूटमुळे ती चर्चेत आली. या लूकमुळे तिला ट्रोलर्सचाही सामना करावा लागला. मात्र त्यावर तिने सडेतोड उत्तर देत ट्रोलर्सची तोंड बंद केली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 4 show marathi actress snehlata vasaikar enter first wild card in show nrp