‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वालाही प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्यांमध्ये वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळालं. ‘बिग बॉस’ च्या घरात स्पर्धकांमध्ये वारंवार खटके उडत आहेत. यावेळी योगेश जाधव आणि त्रिशुल मराठे यांचं जोरदार भांडण झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

योगेश आणि त्रिशुल यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर घरातील सदस्यांनी दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, योगेशला राग अनावर झाला आणि त्याने बिग बॉसच्या घरातील सामानाची तोडफोड केली. घरातील इतर स्पर्धकांवरही तो धावून गेल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर बिग बॉसने योगेशला कॉन्फरन्स रुममध्ये बोलवून घेत त्याने केलेल्या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध केला. यावेळी योगेशला अश्रु अनावर झाले. बिग बॉसला सॉरी म्हणत तो रडल्याचं दिसून आलं.

हेही वाचा >> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये छोट्या हास्यवीरांना सहभागी होण्याची सुवर्णसंधी, ‘इथे’ देता येणार ऑडिशन

‘बिग बॉस’च्या घरातील या सगळ्या प्रकाराबाबत अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री मेघा घाडगे यांनी टास्कदरम्यान योगेशची अक्कल काढली होते. तसेच तू भिकारी आहेस असंही त्या म्हणाल्या होत्या. त्यावरुन सुरेखा यांनी पोस्टमध्ये “आज योगेशला पाहून वाईट वाटलं. विरुद्ध ग्रुपमधील सदस्य त्याला काहीही बोलतील, त्याची अक्कल काढतील. त्याला भिकारी बोलतील तर कोणी का ऐकून घ्यावं? प्रत्येक वेळेला दुसऱ्याची लायकी काढणं कितपत योग्य आहे?”, असं म्हटलं आहे.

हेही वाचा >> Teaser : ‘दगडी चाळ’नंतर अकुंश चौधरी ‘ऑटोग्राफ’मधून प्रेक्षकांच्या भेटीला, एकाचवेळी तीन अभिनेत्रींसह पडद्यावर झळकणार

हेही वाचा >> मराठी अभिनेत्रीने १०×२०च्या जागेत बांधलं नवं घर, पोस्ट शेअर करत म्हणाली “दोन वर्षांपासून…”

सुरेखा कुडची यांनी पोस्टमध्ये अपूर्वाचं नाव न घेता तिला अप्रक्षरित्या टोलाही लगावला आहे. “आज कुणीतरी म्हणालं, कॅप्टन रुमवर आपलाच ताबा असणार आहे. मागील पर्वातही टीम ए मधील सदस्यच कॅप्टन बनले होते (टीम ए मध्येच मीही होते). तरीही घरातील शेवटचा कॅप्टन टीम बीमधील होता आणि विजेताही त्याच टीममधील होता. हे त्यांना बहुतेक आठवत नसेल. एक प्रेक्षक म्हणून हे बोलावसं वाटतं”, असं त्या म्हणाल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi actress surekha kudachi react on yogesh jadhav cry and apurva nemlekar captaincy kak