Shreya Bugde’s look on Navratri: सध्या नवरात्रोत्सव मोठ्या धुमधडाक्यात, मोठ्या उत्साहात आणि आनंदात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीवरील नायिका नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी वेगळा लूक करत असल्याचे दिसत आहे.

आता झी मराठीने सोशल मीडियावर अभिनेत्री श्रेया बुगडेचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये श्रेया नवरात्रीच्या दहाव्या दिवसासाठी सजली आहे.

श्रेयाने जांभळ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे. त्यावर दागिने घातले आहेत. नथ घातली आहे. तसेच, कपाळावर छोटी टिकलीसुद्धा लावली आहे. हातात बांगड्या घातल्या आहेत. तसेच, तिच्या चेहऱ्यावर गोड हसूदेखील पाहायला मिळत आहे. त्यानंतर फोटोसाठी विविध पोझदेखील देताना दिसत आहे.हा व्हिडीओ शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘नवरात्रीच्या दहाव्या दिवसासाठी अशी सजली श्रेया’, अशी कॅप्शन दिली आहे.

नेटकरी काय म्हणाले?

श्रेया बुगडेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करत श्रेयाचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “किती सुंदर दिसतेस”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “विद्या बालन २.०”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “खूप सुंदर”, एका नेटकऱ्याने लिहिले, “नथ खूप सुंदर आहे”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “जेव्हा स्वॅग आणि सौंदर्य एकत्र येतं”, अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी अभिनेत्रीचे कौतुक केले आहे. तर काहींनी हॉर्ट इमोजी शेअर केल्या.

श्रेया बुगडे सध्या चला हवा येऊ द्या या झी मराठी वाहिनीवरील विनोदी कार्यक्रमात काम करत आहे. विविध भूमिका साकारत अभिनेत्री कायमच प्रेक्षकांना खळखळून हसवते. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वात श्रेयाच्या अनेक भूमिका गाजल्या. अभिनेत्रीला मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले.

चला हवा येऊ द्या च्या दुसऱ्या पर्वात सुरुवातीला श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, गौरव मोरे, प्रियदर्शन जाधव या पाच जणांच्या टीम पाहायला मिळाल्या. त्यावेळी कॉमेडीचं गँगवॉर पाहायला मिळाले. आता श्रेया, कुशल, भारत गणेशपुरे, गौरव मोरे, प्रियदर्शन स्वत: स्टेजवर येऊन परफॉर्म करताना दिसतात. प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी हे कलाकार विविध भूमिका अगदी सहजतेने साकारतात. आता आगामी काळात काय शोमध्ये काय गमतीजमती दिसणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.