‘लागिरं झालं जी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला भैय्यासाहेब आणि ‘देवमाणूस’ मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेला देवीसिंग म्हणजे अभिनेता किरण गायकवाड ( Kiran Gaikwad ) लवकरच बोहल्यावर चढणार आहे. काही दिवसांपूर्वीच किरणने प्रेमाची कबुली दिली. अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरबरोबर ( Vaishnavi Kalyankar ) किरण लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांचे सुंदर फोटो सतत व्हायरल होताना दिसत आहेत. अशातच किरणने होणाऱ्या पत्नीसह पहिल्यांदाच रील व्हिडीओ शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता किरण गायकवाडने २९ नोव्हेंबरला सोशल मीडियावर वैष्णवी कल्याणकरबरोबर फोटो शेअर करत प्रेम जाहीर केलं होतं. “तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस; पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायचं ठरवलं आहे…मंत्रिमंडळल्या बैठका होतं राहतील, मंत्री पद वाटत राहतील, त्यांचं ठरतंय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो…ही आहे माझी होणारी ‘होम मिनिस्टर’,” अशी सुंदर पोस्ट लिहून किरणने चाहत्यांना सुखद धक्काच दिला. तेव्हापासून किरण आणि वैष्णवी ही नवी जोडी चर्चेत आली आहे.

हेही वाचा – गरिबांचा रणवीर सिंह म्हणणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला, “माझ्यासाठी ट्रोलिंग…”

नुकतंच किरणने वैष्णवीबरोबर रील व्हिडीओ शेअर केला आहे. ‘जगणं हे न्यारं झालं जी’ गाण्यावर दोघांचा रील व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये दोघांमधील खास क्षण पाहायला मिळत आहेत. किरण पांढऱ्या रंगाच्या प्रिंटेड कुर्ता आणि पायजमामध्ये दिसत आहे. तर वैष्णवी ऑफ व्हाईट रंगाच्या सुंदर साडीमध्ये पाहायला मिळत आहे. दोघांचा हा रील व्हिडीओ क्षणार्धात व्हायरल झाला असून इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – Bigg Boss 18: सलमान खानच्या शोच्या टीआरपीसाठी धडपड, २६९० कोटींची मालकीण शालिनी पासीची घरात एन्ट्री

हेही वाचा – Video: ‘लक्ष्मी निवास’ नव्या मालिकेत झळकणाऱ्या अभिनेत्रीच्या चिमुकल्या लेकीनं गायलं ‘माझा भिमराया’ गाणं, व्हिडीओ पाहून कराल कौतुक

दरम्यान, किरण आणि वैष्णवी यांची पहिली भेट ‘देवमाणूस या मालिकेच्या सेटवर झाली आणि इथे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, किरण सध्या वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर वैष्णवी ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘तिकळी’ नावाच्या मालिकेत दिसत आहे. या मालिकेत तिने नली ही प्रमुख भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devmanus fame kiran gaikwad share reel video with future wife vaishnavi kalyankar pps