‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही लोकप्रिय टीव्ही मालिका आहे. गेली १६ वर्षे ही विनोदी मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. मालिकेत जेठालाल गडा नावाचे मुख्य पात्र साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांचं मालिकेच्या निर्मात्यांशी कडाक्याचं भांडण झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘तारक मेहता…’च्या सेटवर दिलीप जोशी आणि निर्माते असित मोदी यांच्यात जोरदार वाद झाला. दिलीप जोशी आपल्या सुट्ट्यांबद्दल बोलण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा असित मोदी यांनी संभाषण टाळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे दिलीप चिडले.

हेही वाचा – नीना गुप्ता यांचे पती आहेत सीए, पत्नीच्या ‘या’ आर्थिक गुंतवणुकीची खिल्ली उडवतात विवेक मेहरा

न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार प्रॉडक्शनमधील एका सूत्राने घडलेल्या घटनेची माहिती दिली. असित हे दिलीप जोशी यांच्याकडे दुर्लक्ष करून कुश शाहला भेटायला गेले, त्यामुळे दिलीप यांना अपमानास्पद वाटलं. कुशने नुकतीच मालिका सोडली आहे. भांडण इतकं कडाक्याचं झालं की दिलीप जोशी यांनी असित मोदींची कॉलर देखील धरली होती.

हेही वाचा – “बॉलीवूड कलाकार दारूची…”, दिलजीत दोसांझची ‘त्या’ नोटीसनंतर टीका; सरकारला आव्हान देत म्हणाला…

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, दिलीप जोशी व असित मोदी यांचे यापूर्वीही अनेकदा वाद झाले आहेत. शोच्या हाँगकाँग शेड्यूल दरम्यान दोघांमध्ये भांडण झाले होते. तेव्हाही मालिकेतील इतर कलाकारांनी मध्यस्थी करत त्यांचे भांडण सोडवले होते.

हेही वाचा- “ही वाईट वृत्ती आहे” म्हणत ऐश्वर्या रायने खेकड्यांशी केलेली फिल्म इंडस्ट्रीची तुलना

दरम्यान, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील अनेक कलाकारांनी शोला रामराम केला आहे. दिशा वकानी, भव्य गांधी, गुरुचरण सिंग सोढी, शैलेश लोढा, जेनिफर मिस्त्री, नेहा मेहता, कुश शाह यांनी ही मालिका सोडली. यापैकी काही कलाकारांची जागा आता नवीन कलाकारांनी घेतली आहे. तर, दिशा वकानी यांची रिप्लेसमेंट अद्याप निर्मात्यांनी घेतलेली नाही.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dilip joshi asit modi big fight on taarak mehta set hrc