अभिनेता गौरव मोरे आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम यांचं एक अनोखं समीकरण आपल्याला गेल्या काही वर्षांमध्ये पाहायला मिळालं. पवई फिल्टरपाड्याचा हा बच्चन हास्यजत्रेमुळे घराघरांत लोकप्रिय झाला. मराठी कलाविश्वात त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, त्याने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गौरव मोरेने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत हास्यजत्रा कार्यक्रमातून एक्झिट घेत असल्याचं जाहीर केलं आहे. सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत आता मी एक नवीन प्रवास सुरू करत असल्याचं गौरवने त्याच्या चाहत्यांना सांगितलं. अभिनेत्याने हास्यजत्रा सोडल्याची पोस्ट शेअर केल्यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

हेही वाचा : गौरव मोरेने सोडली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’! फिल्टरपाड्याच्या बच्चनची भावुक पोस्ट; म्हणाला, “नाव दिलं, सन्मान मिळाला…”

गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप

गौरवच्या पोस्टवर कमेंट करत नेटकरी म्हणतात, “भाऊ वाईट वाटलं… पण, माझ्यापेक्षा आईला जास्त वाईट वाटलं. नवीन सुरूवातीसाठी अभिनंदन”, “गौरव तुझ्याशिवाय हास्यजत्रा हा शो अधुरा आहे”, “महाराष्ट्राची हास्यजत्रेमध्ये आम्ही तुला खूप मिस करू…”, “तुझ्याशिवाय हास्यजत्रेत मजा नाही”, “भाई तुझ्यासाठी खूप आनंद होतोय पण तितकेच वाईट ही वाटत आहे की आता तुला पुन्हा हास्यजत्रेमध्ये पाहायला नाही मिळणार…” अशा असंख्य प्रतिक्रिया गौरवच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

हेही वाचा : ठरलं तर मग : अखेर तो क्षण आलाच! सायली कुसुमसमोर देणार प्रेमाची कबुली पण, निर्माण होणार मोठा गैरसमज…

दरम्यान, गौरव मोरे सध्या ‘मॅडनेस मचाएंगे’ कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका भागात गौरवने चक्क बॉलीवूड अभिनेत्री जुही चावला हिला इम्प्रेस केलं होतं. शाहरुख खानच्या ‘डर’ चित्रपटातील ‘तू हैं मेरी किरण’ गाण्यावर गौरवने डान्स केला होता. आता भविष्यात तो आणखी काही चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गौरव मोरेच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

हेही वाचा : मराठमोळी ऋतुजा बागवे झळकणार हिंदी मालिकेत! ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याबरोबर साकारणार भूमिका, म्हणाली…

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, गौरव मोरे हास्यजत्रेच्या माध्यमातून घराघरांत लोकप्रिय झाला होता. सध्या अभिनेत्याच्या पोस्टवर काही नेटकऱ्यांनी शो जरी सोडलास तरी अधूनमधून हास्यजत्रेत येत राहा अशी विनंती त्याला केली आहे. तर, काहीजण त्याच्या नव्या प्रोजेक्ट्सबद्दल प्रचंड उत्साही आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gaurav more left maharashtrachi hasya jatra show netizens reacted on his recent post sva 00