‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर गेल्या महिन्यापासून ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवीन मालिका सुरू झाली. अभिनेत्री रेश्मा शिंदे, सुमीत पुसावळे, सविता प्रभुणे, प्रमोद पवार, उदय नेने, आरोही सांबरे अशा अनेक कलाकारांची मांदियाळी असलेली ही मालिका १८ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली. सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिका प्रसारित होतं आहे.

अल्पावधीत ‘घरोघरी मातीच्या चुली’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. हृषिकेश व जानकीच्या जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेल्या या मालिकेला टीआरपी देखील चांगला आहे. दर आठवड्याला येणाऱ्या टीआरपी यादीत ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिका टॉप-१०मध्ये असते. अशा या अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या मालिकेतील हृषिकेश म्हणजे सुमीत पुसावळेनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे; जो चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने शेअर केलेला ऑस्ट्रेलियातील ‘तो’ व्हिडीओ पाहून भडकला प्रसाद खांडेकर, म्हणाला…

सुमीत पुसावळेनं शेअर केलेल्या व्हिडीओत, मालिकेतल्या गावकऱ्याला वाचवण्याचा सीन कशाप्रकारे चित्रीत झाला, हे पाहायला मिळत आहे. हार्नेस लावून सुमीत सीन करताना दिसत आहे.

हेही वाचा – विकास पाटीलच्या बायकोनं ४० प्रयोगांनंतर पाहिलं ‘ऑल दि बेस्ट’ नाटक, पोस्ट करत म्हणाला, “सगळं जग बघून…”

दरम्यान, सुमीतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेच्या आधी ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’मध्ये सुमीतने साकारलेली बाळूमामांची भूमिका खूप गाजली होती. याआधी त्यानं ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘लागीरं झालं जी’ या मालिकेत काम केलं होतं.