Gharoghari Matichya Chuli Upcoming Twist: ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या या मालिकेत सतत नवीन ट्विस्ट येताना दिसतात.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, ऐश्वर्या सतत रणदिवे कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न करते. तिच्या नवऱ्याला सारंगला हाताशी धरून ती अनेक कट-कारस्थाने करताना दिसते. जानकी आणि हृषिकेशला ती सतत त्रास देते. आतापर्यंत अनेकदा तिने जानकीला मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, घरात फूट पाडून जानकी आणि हृषिकेशला वेगळे करून, त्यांना त्रास दिला. हृषिकेश जानकीदेखील ऐश्वर्याच्या कट-कारस्थानांचा सामना करताना दिसतात.

‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत ट्विस्ट

ऐश्वर्याचे खरे रूप समोर आल्यानंतर सारंगला पश्चात्ताप झाल्याचे पाहायला मिळाले. सारंगने ऐश्वर्याविरुद्ध जात जानकी आणि हृषिकेशची मदत करायचे ठरवले. मग त्यांनी सारंगचा मृत्यू झाला आहे, अशी योजना आखून, ऐश्वर्याला तिच्याच जाळ्यात फसवण्याचे ठरवले.

आता ऐश्वर्याविरुद्ध संपूर्ण रणदिवे कुटुंब एकत्र आल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. त्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सारंग त्याचे रूप बदलून घरात येतो. तो मनातल्या मनात म्हणतो की, आईला हे सांगायला हवं की, मी जिवंत आहे. त्यानंतर तो त्याच्या आईच्या खोलीत जातो. खोट्या दाढी-मिशा काढतो आणि तो जिवंत असल्याचे सांगतो.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की जानकी हृषिकेश आणि इतरांना म्हणते की, मला खात्री आहे की, आई आपल्याला नक्की समजून घेतील. तितक्यात हृषिकेशची आई तिथे येते. ती म्हणते की, जानकी मी आता फक्त समजून घेणार नाही, तर तुमच्या या योजनेमध्ये सामीलही होणार आहे. त्यानंतर जानकी म्हणते की, आईंची साथ म्हणजे ऐश्वर्यावर मात झालीच समजा.

हा प्रोमो शेअर करताना ‘संपूर्ण रणदिवे कुटुंब ऐश्वर्यावर मात करण्यासाठी एकत्र येणार’, अशी कॅप्शन दिली आहे.

आता मालिकेत पुढे काय होणार, ऐश्वर्याचा खोटेपणा सर्वांसमोर येणार का, सत्य समोर आल्यानंतर मालिकेत नेमके काय वळण येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.