Akshay Kelkar Celebrate Diwali After Marriage : दिवाळीनिमित्त सगळीकडे आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. ठिकठिकाणी दिव्यांची रोषणाई, आकर्षक कंदील व रंगीबेरंगी रांगोळ्यांची सजावट पाहायला मिळत आहे. दिवाळीनिमित्त घरोघरी फराळाचाही आनंद लुटला जात आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदी आनंदच आहे. त्यात लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा दिवाळीचा सण तर खूपच खास असतो.

यंदा अनेक मराठी कलाकारांनी त्यांचा लग्नानंतरचा पहिला दिवाळसण साजरा करीत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता अभिनेता अक्षय केळकर. अक्षय केळकरने यंदा त्याचा पहिला दिवाळसण साजरा केला आणि या पहिल्या दिवाळसणाची खास झलक त्यानं सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

अक्षय केळकर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याच्या कामानिमित्तची माहिती, तसेच आपले अनेक फोटो-व्हिडीओही शेअर करताना दिसतो. अशातच त्यानं दिवाळसण साजरा केल्याचा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अक्षय केळकरचे स्वत:चे यूट्यूब चॅनेल असून, व्लॉगच्या माध्यमातून तो अनेक अपडेट्स देत असतो.

अशातच त्याने दिवाळसण साजरा केल्याचा एक व्लॉग व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तो त्याची पत्नी साधना काकतकरला सजावटीसाठी मदत करताना दिसत आहे. पुढे अक्षय आणि साधना त्यांच्या लहानपणीच्या दिवाळीच्या आठवणी सांगतात. त्यानंतर पुढे साधना त्याला उटणे लावते. नंतर दोघे फराळाचा आस्वाद घेतात आणि एकमेकांना फराळ खाऊ घालतात. व्हिडीओमध्ये पुढे अक्षय घराच्या बाल्कनीत फुलबाजा पेटवत आनंद घेतोय. त्यानंतर शेवटी दोघे चाहत्यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देतात.

अक्षय केळकर हे नाव मराठी मालिका आणि रिअ‍ॅलिटी शोमधून घराघरांत पोहोचलेले आहे. अक्षयने ‘बिग बॉस मराठी’ या शोमध्येही सहभाग घेतला होता. या वर्षी ९ मे रोजी त्यान गर्लफ्रेंड साधना काकतकरशी लग्न केले.

अक्षय केळकरने शेअर केला पहिल्या दिवाळसणाचा व्हिडीओ

दहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघे लग्नबंधनात अडकले. त्यानंतर दोघे एकत्र सण साजरे करताना दिसतात. अशातच त्यांनी पहिला दिवाळसण आनंदात साजरा केला असून, हा आनंद त्यांनी चाहत्यांबरोबरही शेअर केला आहे.

दरम्यान, अक्षयच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ‘बिग बॉस मराठी ४’मध्ये सहभाग घेतला होता. ‘ढोलकीच्या तालावर’ या शोमध्ये त्याने सूत्रसंचालनही केले होते. तो कलर्स मराठीच्या ‘अबीर गुलाल’ या मालिकेत मुख्य भूमिकेत होता. तसेच तो ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातही पाहायला मिळाला होता. अशातच आता तो स्टार प्रवाहवरील ‘काजळमाया’ या हॉरर मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.