khushboo Tawde Reacted When A Fan Told Her You Should Have Married Popatlal From TMKOC : खूशबू तावडे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठीसह तिनं हिंदीतही काम करत तिच्या सहजसुंदर अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अनेक जण तिला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील तिच्या भूमिकेमुळे ओळखतात.

खूशबूने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये बुलबुल हे पात्र साकारलं होतं. त्यावेळी तिची ती भूमिका खूप गाजली होती. तिनं त्या मालिकेतील तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यामुळे अजूनही लोक तिच्या त्या भूमिकेची आठवण काढताना दिसतात.

खूशबूनं ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये साकारलेल्या बुलबुल या पात्रासंदर्भातील अनेक मिम व रीलही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिच्या या भूमिकेमुळे मालिकेतील पोपटलाल पत्रकाराच्या आयुष्यात मोठं वळण आलं होतं. अशातच आता खूशबूनं नुकतंच सोशल मीडियवर ‘आस्क मी’ हे सेशन घेतलं होतं. त्यामध्ये तिनं तिला विचारण्यात आलेल्या प्रश्नाची उत्तरं दिली आहेत.

खुशबूला यावेळी एकानं ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील तिच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारला आहे. या सेशनदरम्यान तिला, “पोपटलालसोबत लग्न व्हायला हवं होतं”, असं एकानं म्हटलं आहे. त्यावर अभिनेत्रीनं “हो खरं तरं”. असं उत्तर दिलं आहे.

खुशबू तावेडची इन्स्टाग्राम स्टोरी

खुशबूला या सेशनमध्ये तिच्या मुलीबद्दलही प्रश्न विचारण्यात आला होता. एका नेटकऱ्यानं तिला, “तुझी मुलगी राधीचा चेहरा कधी दाखवणार” याबाबत विचारलं. त्यावर “लवकरच कदाचित तिच्या पहिल्या वाढदिवसाला”, असं उत्तर तिनं दिलं होतं. खूशबू तावडेनं ऑक्टोबर २०२४ मध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिला राघव नावाचा एक मुलगाही आहे.

खुशबू तावडेची इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, खुशबूच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं आजवर अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. तिनं चित्रपटांतही काम केलं आहे. अलीकडेच तिनं ‘झी मराठी’वरील ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. पहिल्या बाळाच्या जन्मानंतर खूशबूनं पहिल्यांदाच या मालिकेत काम करत इंडस्ट्रीत कमबॅक केलं होतं. त्यासह तिनं, ‘आम्ही दोघी’, ‘तेरे बिन’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ यांसारख्या मालिकांमधून काम केलं आहे.