Ankita Walawalkar : प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर व तिचा पती संगीतकार कुणाल भगत हे दोघंही युरोप फिरायला गेले आहेत. इन्स्टाग्रामवर मिनी ट्रॅव्हल व्हिडीओ शेअर करत अंकिताने याबाबत तिच्या चाहत्यांना माहिती दिली आहे.

युरोपला पोहोचल्यावर अंकिता कोणकोणते देश फिरणार याबद्दल तिच्या चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत अंकिताने ती सर्वप्रथम लक्झेंबर्गला गेल्याचं सांगितलं. यानंतर ‘कोकण हार्टेड गर्ल’ने फ्रान्सच्या दिशेने प्रवास सुरू केला. सध्या अंकिता व कुणाल पॅरिसमध्ये आहेत. कुणालने इन्स्टाग्रामवर आयफेल टॉवरजवळील सुंदर फोटो शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आयुष्यात एकदा तरी आयफेल टॉवर पाहायला जायचं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आयफेल टॉवर हे जगभरातल्या पर्यटकांसाठी आकर्षणाचं स्थान आहे. आयफेल टॉवरची निर्मिती १८८७ ते १८८९ या दोन वर्षांमध्ये करण्यात आली. मे १८८९ मध्ये ही वास्तू पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. याठिकाणी अनेक जोडपी प्री-वेडिंग शूट करण्यासाठी जातात. तर, काही कपल्स आयफेल टॉवरसमोर एंगेजमेंट देखील करतात.

सध्या ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर आणि तिचा पती कुणाल हे दोघंही पॅरिस सफर करत असल्याचं पाहायला मिळत आहे. कुणालने इन्स्टाग्राम स्टोरीवर आयफेल टॉवरची झलक दाखवली आहे. तसेच अंकिताबरोबरचा सुंदर फोटो देखील शेअर केला आहे.

https://images.loksattaimg.com/2025/05/kunal.mp4

आता ‘कोकण हार्टेड गर्ल’ लक्झेंबर्ग आणि पॅरिसनंतर आणखी कोणत्या जागी भेट देणार? युरोपातील कोणकोणते देश फिरणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

अंकिता वालावलकर व कुणाल भगत यांची पॅरिस ट्रिप ( Kokan Hearted Girl )

दरम्यान, अंकिताचा नवरा कुणाल भगतबद्दल सांगायचं झालं, तर मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय संगीतकार म्हणून कुणालला ओळखलं जातं. ‘येक नंबर’ या सिनेमासाठी कुणालने संगीत दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. याशिवाय ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकांना देखील त्याने संगीत दिलं आहे.