Lagnanantar Hoilach Prem upcoming twist: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका दिवसेंदिवस गाजताना दिसत आहे. या मालिकेतील काव्या, पार्थ, जीवा,नंदिनी, मानिनी, रम्या अशी सगळीच पात्रे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. याबरोबरच मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवताना दिसत आहेत.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, मानिनीला काही दिवसांपूर्वीच हे समजले आहे की काव्याचे लग्नाआधी कोणावर तरी प्रेम होते. हे तिला तिच्या मैत्रीणीकडून समजले आहे. मात्र, तो मुलगा जीवा होता, हे मात्र तिला माहित नाही.

मानिनीने काव्याला याबद्दल विचारल्यानंतर काव्याने आता तिचे कोणावरही प्रेम नाही, असे स्पष्ट केले आहे. मात्र, तरीही लग्नानंतर काव्याचे प्रेमप्रकरण सुरू आहे, म्हणून काव्या पार्थबरोबर मुद्दाम नीट वागत नाही, असे मानिनीला वाटत आहे. त्यामुळे मानिनीची आता काव्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. आता मालिकेत नवीन ट्विस्ट आला आहे.

मालिकेत नवीन ट्विस्ट

स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की काव्याने फ्रूट सॅलेड बनवले आहे. ते घेऊन मानिनी उभी आहे. तिथे काव्या, पार्थदेखील आहेत. ते फ्रूट सॅलेड बघून पार्थला आनंद होतो. तो उत्साहाने म्हणतो, वाह काव्याने बनवलेले फ्रूट सॅलेड? मला भूक लागलीच होती. दे आई, असे म्हणून तो ते फ्रूट सॅलेड मानिनीकडे मागतो. तर मानिनी मुद्दाम ती काचेचे भांडे खाली टाकते. त्यामुळे भांडे फुटते.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की काव्या रडत आहे. ती रडत तिच्या मैत्रीणीला म्हणजे, आज पार्थच्या डोळ्यात पाणी आलं.त्यांना त्रास झाला हे बघून मला काहीच वाटणार नाही का? त्यावर तिची मैत्रीण तिला विचारते की कोणत्या हक्काने? काव्या म्हणते, “अगं कोणत्या हक्काने म्हणजे काय? मी त्यांची बायको… असे म्हणता म्हणता काव्या थांबते.

हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, “काव्याला होणार पार्थ आणि तिच्या नात्याची जाणीव”, अशी कॅप्शन दिली आहे.

नेटकरी काय म्हणाले?

हा प्रोमो पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. “काव्याने पार्थला स्वीकारण्यास सुरुवात केली”, “खूप छान प्रोमो आहे”, “आम्हाला काव्या व पार्थ यांना एकत्र पाहायचे आहे”, असे लिहित मत व्यक्त केले.

तर अनेक नेटकऱ्यांनी मानिनीचे वागणे आवडत नसल्याचे लिहिले आहे. “आता जरा अतीच होत आहे”, “काव्या आणि पार्थ यांच्या स्टोरीमध्ये काहीतरी सकारात्मक दाखवा. मानिनीचे वागणे मला आवडत नाहीये”, “मानिनी काकू आता अतीच होत आहे”, “सगळा ट्रॅकच नकारात्मक केला आहे”, “मानिनी काकू तुमचं वागणं चांगलं नाही”, “ज्या दिवशी मानिनीला कळेल की तो तिचा मुलगा जीवा आहे. तर तोंड दाखवता येणार नाही”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहे.

दरम्यान, मालिकेत आता पुढे काय घडणार, मानिनीला संपूर्ण सत्य कधी माहित होणार, काव्याला पार्थविषयीच्या प्रेमाची जाणीव होणार का, काव्य व पार्थ यांच्यातील दुरावा संपणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.