मालिकेत येणारे ट्विस्ट प्रेक्षकांची उत्सुकता टिकवून ठेवतात. त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. लय आवडतेस तू मला ही मालिका सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. सानिका आणि सरकारच्या आयुष्यात अनेक घटना घडत आहेत. पंकजा, सर्वेश व सईने रचलेल्या जाळ्यात सानिका अडकते आणि सरकारवर असलेल्या विश्वासाला तडा जातो. तेव्हापासून दोघांचे नाते एका नाजूक वळणावर येऊन पोहचले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरकार-सानिका लग्नगाठ बांधत असतानाच साहेबराव गोळी झाडणार

आता मात्र सानिकाचे सरकारविषयीचे गैरसमज दूर होत असल्याचे दिसत आहे. अखेर सानिकाला झालेला गैरसमज दूर होतो आणि तिला विश्वास पटतो कि सरकारने तिला त्यांच्याबद्दलचे खरं सांगितले होते. लवकरच सरकार आणि सानिका लग्नगाठ बांधणार आहे. पण, त्याच दरम्यान साहेबराव त्यांचे लग्न मोडण्यासाठी देवळात येऊन सरकारवर गोळी झाडतात. सरकार सानिकाच्या लग्नातील विघ्न कसे दूर होणार? आता पुढे नक्की काय होणार ? सानिका आणि सरकारचे नाते पुढे कुठल्या वळणावर येणार ? या सगळ्या गुंतागुंतीच्या गोष्टीमधून नक्की मालिकेत पुढे काय घडणार? हे बघणे रंजक असणार आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, आता बघायला मिळत आहे सरकार सानिकाला सई त्याच्या मामाची मुलगी आहे आणि तिला दोघांमध्ये दुरावा आणि वाद घडवून आणायचे आहेत म्हणून ती नाटक करतेय. सानिकाला सरकारचे म्हणणे पटते. सानिका सईला हाकलवायला जाते. सई सानिकावर हल्ला करते ते बघून साहेबराव रागाने सईला घराबाहेर काढतात. हे घडत असताना सानिका – सरकार यांच्या नात्याबद्दल सावित्रीला कळते. सानिका सरकार सावित्रीसमोर प्रेमाची कबुली देतात. याचे वाईट परिणाम दोघांना भोगायला लागतील म्हणून सावित्री त्यांना पळून जाण्याचा सल्ला देते.

सावित्री समजावते सानिका आणि सरकारला पळून जाण्याशिवाय पर्याय नाही. सानिकाला सावित्रीची खंबीर साथ नेहेमीच मिळाली आहे आणि तिच्या साथीने सरकार – सानिका या अग्निदिव्यातून देखील बाहेर येणार का ? कसे या कठीण परिस्थितीला सामोरे जातील. हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lai avadtes tu mala twist in serial sahebrao will shoot when sarkar and sanika are tying the knot nsp