Mrunmayee Gondhalekar Dance On Song Piya Tose Naina Lage Re: अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर सध्या ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेतील तिने तुळजा ही भूमिका साकारली आहे. एक आदर्श पत्नी, आदर्श वहिनी अशी तिची भूमिका पाहायला मिळते. तिच्या पतीला म्हणजेच सूर्याला ती वेळोवेळी प्रत्येक संकटात साथ देते. सूर्याच्या चारही बहि‍णींना ती आईप्रमाणे जीव लावते, त्यांच्यावर प्रेम करते. त्यांना योग्य मार्गदर्शनही करते.

तुळजाचे वडील म्हणजेच डॅडी सूर्याविरुद्ध कट कारस्थान करताना दिसतात. तुळजाने स्वतःच्या वडिलांचा खरा चेहरा सूर्यासमोर आणण्याचा अनेकदा प्रयत्न केला आहे. मात्र, सूर्या डॅडींविरुद्ध काहीही ऐकून घेत नसल्याचे दिसले. तुळजाच्याच प्रयत्नाने सूर्याची आई आशा जगताप कुटुंबात परतू शकली असल्याचे पाहायला मिळत आहे.

मृण्मयी गोंधळेकरचा ‘पिया तोसे नैना लागे रे’ गाण्यावर डान्स

आता मात्र अभिनेत्री तिच्या भूमिकेमुळे नाही तर तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट मुळे चर्चेत आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती ‘पिया तोसे नैना लागे रे’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिच्या नृत्याने तसेच हावभावाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना तिने प्रेमाचा मूक संवाद अशा आशयाची कॅप्शन दिली आहे. अनेक चाहत्यांनी तिच्या या व्हिडीओवर कौतुक करणाऱ्या कंमेंट केल्या आहेत.

गिरीजा प्रभू, निशाणी बोरुळे या अभिनेत्रींनी मृण्मयीच्या डान्सचे कौतुक केले आहे. तर चाहत्यांनीदेखील तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले,”सुंदर”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “माझ्याकडचे कौतुकाचे शब्द संपत चालले आहेत”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “हावभाव आणि नृत्य खूप सुंदर आहे”, एका नेटकऱ्याने लिहिले, “कमाल हावभाव आहेत”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “तुझ्या अभिनयाप्रमाणेच तुझा डान्सदेखील उत्तम आहे”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “वाह”, असे म्हणत मृण्मयीचे कौतुक केले आहे.

दरम्यान, ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत सध्या ट्विस्ट आल्याचे दिसत आहे. शत्रूने सूर्याच्या बहिणीच्या म्हणजेच तेजूच्या चरित्र्यावर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे सूर्याचा संताप अनावर झाल्याचे पहायला मिळत आहे. तेजू तेव्हा परडी परीक्षा देण्यास तयार झाली तेव्हा शत्रूणेदेखील ती परीक्षा द्यावी असे सूर्याने मत मांडले. तसेच तो देवीसमोर तांडव देखील करणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमो मध्ये पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.