Lakshmi Niwas Fame Actor Shares Anecdote: ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतील सर्वच पात्रे प्रेक्षकांची लाडकी आहेत. या मालिकेतील लक्ष्मी व श्रीनिवास संपूर्ण घराला बांधून ठेवतात. स्वत:चं हक्काचं घर असावं असं त्यांचं स्वप्न आहे. रोजच्या जगण्यात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, तरीही त्याला धीराने तोंड देत असल्याचे पाहायला मिळते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मालिकेत लक्ष्मी व श्रीनिवाससह भावना, सिद्धू, जान्हवी, संतोष, व्येंकी, हरीश, वीणा, आनंदी, विश्वा अशी अनेक पात्रे पाहायला मिळतात. आता मालिकेच विश्वा या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्याने त्याचा एक अनुभव सांगितला आहे. अभिनेता अनुज प्रभूने लक्ष्मी निवास या मालिकेत विश्वा ही भूमिका साकारली आहे.

विश्वा हा जान्हवीचा चांगला मित्र होता. तो तिच्या प्रेमात पडला. ज्या दिवशी तो त्याच्या मनातील भावना सांगण्यासाठी जान्हवीकडे गेला, त्याच दिवशी जान्हवीने ती लग्न करत असल्याचे त्याला सांगितले. पुढे जान्हवीचे लग्न झाले. मात्र, प्रेमभंग झाल्याने विश्वाला त्या गोष्टीचा खूप त्रास झाल्याचे पाहायला मिळाले. याच दु:खात तो मद्यप्राशनदेखील करत होता.

‘लक्ष्मी निवास’ मधील अभिनेता काय म्हणाला?

अभिनेता अनुज प्रभूने नुकतीच ‘स्टार मीडिया मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्याने त्याचा अनुभव सांगितला. अनुज प्रभू म्हणाला, “मी मच्छी मार्केटला गेलो होतो. तेव्हा मालिकेत तो ट्रॅक चालू होता की मी दारु पिऊन रडत होतो. तेथील सर्वांनी मला ओळखले. सगळे मला म्हणायला लागले की तू किती दारू पितोस, किती रडतोस. एका कोळीणबाईने तर मला एक पापलेट दिला. मला मासे खूप आवडतात. त्यामुळे मला खूप छान वाटलं. त्या म्हणाल्या की मला तुझं काम आवडतं, तू रडतोस तर मला रडायला येतं. मला ते बघून खूप छान वाटलं. हे सगळं मालिकेमुळे आहे. यासाठी मालिकेचे आभार मानतो”, असे म्हणत अभिनेत्याने किस्सा सांगितला.

लक्ष्मी निवास मालिकेत दाखविल्याप्रमाणे, जान्हवीचे लग्न जयंतबरोबर होते. जयंतचे जान्हवीवर खूप प्रेम आहे. मात्र, जान्हवीने फक्त त्याच्यावरच प्रेम करावे, त्याच्यावर लक्ष द्यावे, असे त्याला वाटते. त्यामुळे अनेकदा विकृतपणे वागताना दिसतो. कधी तिला घरात कोंडून ठेवतो. तिने कोणाशी संपर्क साधू नये म्हणून घरात जॅमर लावतो, अनेकदा तो तिच्यावर संशयही घेतो.

दरम्यान, आता मालिकेत सिद्धू भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळाले. सिद्धूच्या या कृतीचे काय परिणाम होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakshmi niwas fame actor anuj prabhu shares anecdote of fan says one fish seller give him paplet nsp